History, asked by ghogrekrushna, 1 month ago

भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागलेला आहे कारण लिहा​

Answers

Answered by nikhilap2005
1

Explanation:

पर्यटन म्हणजे प्रवास. इंग्रजी भाषेतील ‘टूरिझम’ या संज्ञेचा हा पर्याय आहे. इंग्रजी भाषेत ‘टूरिस्ट’ म्हणजे ‘पर्यटक’ ही संज्ञा ‘ट्रॅव्हलर’ (प्रवासी) या शब्दाऐवजी एकोणिसाव्या शतकारंभी वापरण्यात येऊ लागली. आधुनिक काळात पर्यटन हा एक स्वतंत्र राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योग म्हणून विकसित झाल्याचे दिसून येते. देशातील व परदेशांतील पुरावास्तू, इतिहासप्रसिद्ध व निसर्गरम्य स्थळे, प्राचीन कलानिर्मितीची केंद्रे, पवित्र तीर्थक्षेत्रे, प्रचंड औद्योगिक व इतर प्रकल्प इत्यादींचे आकर्षण ही पर्यटनामागील मुख्य प्रेरणा होय. ही प्रेरणा सार्वत्रिक व सर्वकालीन असली, तरी आधुनिक काळातील ज्ञानप्रसाराची व दळणवळणाची सुलभ साधने विकसित झाल्याने आधुनिक पर्यटन-उद्योगास विशेष चालना मिळाली. निसर्गनिर्मित व मानवनिर्मित रम्य व भव्य असे इहलोकीचे जे सौंदर्य आहे, त्याची खास आस्था हा आधुनिक माणसाचा धर्म आहे. ते सौंदर्य सर्वांसाठी आहे, अशीही आधुनिक माणसाची धारणा आहे. पर्यटनामागील आधुनिक माणसाची प्रेरणा वरील भूमिकेचा निर्वाळा देते.

आधुनिक काळातील पर्यटकांच्या वर्गात विविध उद्देशांनी प्रवास करणाऱ्‍यांचा अंतर्भाव होतो. मुख्यतः पर्यटनकाळ हा मर्यादित असतो. आठवड्यातील सुट्या, रजा तसेच एखाद्या कार्याचा वा कार्यक्रमाचा भाग म्हणून नियोजित कालावधीत पर्यटन केले जाते. प्रेक्षणीय स्थळे पाहणे, आरोग्यधामात निवास करणे. अभ्यास वा संशोधन करणे, सदिच्छा भेटीचा घटक म्हणून प्रसिद्ध स्थळे पाहणे यांसारख्या विविध हेतूंनी पर्यटकांची ये-जा चालू असते. उत‌्प्रवासी (एमिग्रंट), आप्रवासी (इमिग्रंट) आणि स्थलांतर करणारे मजूर इत्यादींपेक्षा पर्यटक हे वेगळे समजले जातात. आधुनिक अर्थशास्त्रीय परिभाषेत पर्यटक हा सामान्यतः ग्राहक वा उपभोक्ता समजला जातो. तो उत्पादक नसतो.

पर्यटनाचे क्षेत्र अंतर्देशीय तसेच आंतरराष्ट्रीय असते. जुन्या पर्यटनस्थळांची व्यवस्था राखणे व नवीन पर्यटनस्थळे विकसित करणे, ही पर्यटन उद्योगाची महत्त्वाची अंगे होत. अनुषंगाने देशी-परदेशी पर्यटकांना आकृष्ट करणे, त्यासाठी नियोजनपूर्वक प्रसिद्धियंत्रणा उभी करणे, पर्यटकांना वाहतुकीच्या तसेच निवास-भोजनादी सुखसोयी उपलब्ध करून देणे, हेदेखील पर्यटन उद्योगाचे महत्त्वाचे घटक ठरतात. पर्यटनाद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर परस्परांविषयी सामंजस्य व सद‌्भाव निर्माण करण्याचे कार्यही साधले जाते.

आधुनिकपूर्व काळातील प्रवासाची उद्दिष्टे प्राधान्याने धार्मिक, व्यापारी व विद्याध्ययनात्मक असत. पश्चिमी प्रबोधनकाळापासून एकूणच जीवनविषयक दृष्टिकोन हा इहलोकनिष्ठ होऊ लागला व सांस्कृतिक, ऐतिहासिक, कालवाङ्मयीन, नव्याजुन्या निर्मितीबद्दल नवे आकर्षण निर्माण झाले. आधुनिक पर्यटनदृष्टीचा आरंभ तेव्हापासूनच झाला, असे म्हणता येईल. ही दृष्टी केवळ धनिक वर्गापुरतीच मर्यादित न राहता, ती सर्वसामान्य लोकांतही निर्माण होऊ लागली.

पश्चिमी प्रबोधनकाळात पर्यटनाचे उद्दिष्ट अधिक मौलिक स्वरूपाचे ठरले. टॉमस कुकने ६०० लोकांची लीसेस्टर ते लाफबरो अशी रेल्वेसहल आयोजित केली, १८५५ च्या पॅरिस प्रदर्शन काळात, कुकने लीसेस्टर-कॅले अशा सहली काढल्या व पुढल्याच वर्षी संबंध यूरोपची भव्य अशी पहिली वर्तुळाकार सहल यशस्वीपणे घडवून आणली. काही वर्षांनंतर कुकने मोठ्या प्रमाणात पर्यटक तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. अशा तऱ्‍हेने आधुनिकपर्यटनयुगाचा प्रारंभ झाला.

आर्थिक दृष्टिकोन : आर्थिक दृष्टिकोनातून पर्यटन उद्योग महत्त्वाचा ठरतो. पर्यटन उद्योगमुळे सेवाउद्योगांना महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले. वस्तू, त्यांचे उत्पादन, वितरण व सेवन हेच दीर्घकाळ आर्थिक विश्लेषणाचे प्रमुख चर्चाविषय होते आणि परिणामी सेवाउद्योगांकडे दुर्लक्ष झाले होते. पर्यटनाच्या योगे देशांत-परदेशांत होणारी माणसांची वाढती वर्दळ व हालचाल ह्यांमुळे सेवाक्षेत्राला एकूण उत्पादनाच्या वर्तुळात महत्त्वाचे स्थान प्राप्त होऊ लागले. पर्यटनामुळे व्यापाराचे प्रमाण व परिणाम यांचा विस्तार झाला. हिमाच्छादित पर्वतशिखरे, निर्मनुष्य समुद्रकिनारा, निर्मनुष्य वनप्रदेश या उपेक्षणीय गोष्टी पर्यटनक्षेत्रात येऊ लागल्या व त्या प्रथम दर्जाच्या आर्थिक मत्ता ठरल्या.

पर्यटनामुळे जो प्रत्यक्ष पैसा मिळतो, त्याहीपेक्षा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये गुणक परिणामामुळे जी भर पडते किंवा पर्यटक खर्चाच्या उलाढालींमुळे निर्माण होणाऱ्‍या पैशाची जी भर पडते, तिचे महत्त्व अधिक असते. याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे करता येईल : पर्यटनावर पैशाचा जो प्रत्येक एकक खर्च होत असतो, तो सबंध अर्थव्यवस्थेत फिरत राहतो आणि त्यायोगे त्याच्याशी ज्या ज्या लोकांचा संबंध येत राहतो, त्यांचा वाढीव प्रमाणात फायदा होत राहतो. अर्थशास्त्रज्ञांनी पर्यटनाचा गुणक परिणाम भारताच्या बाबतीत ३·५ एवढा काढला आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर, एका पर्यटकाचा एक रुपया खर्च झाल्यास, त्यायोगे अर्थव्यवस्थेमध्ये ३·५ रुपये किंमतीची उलाढाल होते.

आंतरराष्ट्रीय पर्यटनाप्रमाणेच अंतर्गत पर्यटनाचाही देशाच्या आर्थिक स्थितीवर अनुकूल परिणाम होत असतो. मात्र याबाबतची आकडेवारी आंतरराष्ट्रीय पर्यटनाप्रमाणे सुलभपणे मिळू शकत नाही. ढोबळ अंदाजाप्रमाणे अंतर्गत पर्यटनामुळे जी आर्थिक उलाढाल निर्माण होते, ती आंतरराष्ट्रीय पर्यटनामुळे निर्माण होणाऱ्‍या उलाढालीच्या दसपटींनी अधिक असते.

Write Any Points

Similar questions