भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्यानेच सुरू झाला आहे. (चूक की बरोबर ते सकारण सांगा)
Answers
Answer:बरोबर
Explanation: प्रवास आणि पर्यटनासाठी भारत हा जागतिक दर्जाचा एक मोठा बाजार आहे.
गेल्या काही वर्षांत जलपर्यटन, साहस, वैद्यकीय, चित्रपट, ग्रामीण आणि धार्मिक पर्यटन अशा विविध कारणांसाठी भारतात येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे. देशी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आध्यात्मिक पर्यटनाचे ठिकाण म्हणून भारताला प्रसिद्धी मिळालेली आहे.
'अतुल्य भारत', 'अतिथी देवो भव' यांसारख्या सरकारी योजना, सोपी व्हिसा प्रक्रिया, भांडवल गुंतवणूक अशा विविध उपाययोजना करून भारत सरकारदेखील पर्यटन व्यवसायाला चालना देत आहे. त्यामुळे भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्याने सुरु झाला आहे.
उत्तर :-
हे विधान बरोबर आहे ; कारण
भारतात फार पूर्वीपासून पर्यटन व्यवसायात लोक गुंतलेले असूनही आधुनिक काळात पर्यटन व्यवसायाकडे नव्याने व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. सद्यः स्थितीत विविध पर्यटन प्रकार, पर्यटकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा इत्यादी बाबतींत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.