भारत व ब्राझील प्राकृतिक रचनेतील फरक सांगा
Answers
Explanation:
उत्तर : (१) भारताच्या प्राकृतिक रचनेचे प्रामुख्याने हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह हे पाच विभाग केले जातात. याउलट, ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचे उच्चभूमी, अजस कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह हे पाच प्राकृतिक विभाग केले जातात.
(२) भारतात विविध भागांत उंच पर्वत आढळतात. याठलट, ब्राझीलमध्ये उंच पर्वत आढळत नाहीत.
(३) भारताच्या उत्तर भागात हिमालयाचा पर्वतीय प्रदेश आहे. भारताच्या दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भागात पश्चिम घाट व पूर्व घाट हे पर्वतीय प्रदेश आहेत.
(४) भारतातील पर्वतीय प्रदेशाच्या सर्वोच्च उंचीची कक्षा ७००० मीटर ते ८००० मीटर आहे. याउलट, ब्राझील देशातील उच्चभूमीच्या सर्वोच्च उंचीची कक्षा १००० मीटर ते २००० मीटर आहे.
(५) भारतात उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात थरचे वाळवंट आहे. याउलट ब्राझीलमध्ये अशा स्वरूपाचा उष्ण वाळवंटी प्रदेश नाही. (६) भारताच्या उत्तर भागात विस्तीर्ण मैदाने आढळतात. याउलट ब्राझीलमध्ये अशा स्वरूपाची विस्तीर्ण मैदान आढळत नाहीत.
(७) भारतात किनारपट्टीच्या भागात विविध पश्चजलाचे प्रदेश आढळतात. असे प्रदेश ब्राझील देशात आढळत नाहीत. (८) ब्राझीलमध्ये अजस कडा आढळतो. ब्राझीलच्या उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे अंकित होते. याउलट, भारतात पठारांची
सीमा अंकित करणारे अशा स्वरूपाचे अजख कडे आढळत नाहीत.
Answer: