भारत व ब्राझील या देशाचा लोक्संख्या वितरणातील साम्य व फरक स्पष्ट करा
Answers
Explanation:
दोन्ही देशाच्या अतिउत्तर मध्य व वायव्य भागात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे
2 भारतातील मध्य प्रदेश राज्यात व ब्राझीलमधील मध्य भागातील माटो ग्रासो लोकसंख्या तुलनेने विरळ आहे
Answer:
भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणात साम्य व फरक आहे.
Explanation:
अ) भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील साम्य:
१. दोन्ही देशांच्या उत्तर, मध्य व वायव्य भागात लोकसंख्या विरळ आहे.
२. भारतातील उत्तरेकडील जम्मू आणि काश्मीर या राज्यात व ब्राझीलमधील उत्तरेकडील अॅमापा राज्यात लोकसंख्या विरळ आहे.
३. भारतातील मध्य भागातील मध्य प्रदेश राज्यात व ब्राझीलमधील मध्य भागातील माटो ग्रासो राज्यात लोकसंख्या विरळ आहे.
४. भारताच्या वायव्य भागातील राजस्थान राज्यातील थराच्या वाळवंटात व ब्राझीलमधील वायव्य भागातील अॅमेझोनास राज्यात लोकसंख्या विरळ आहे.
५. भारतातील पूर्व व पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात आणि ब्राझीलमधील पूर्व आणि आग्नेय किनारपट्टीच्या भागात लोकसंख्या दाट आहे.
आ) भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील फरक:
१. भारतातील गंगा व इतर नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशांत लोकसंख्या दाट आहे. याउलट, ब्राझीलमधील अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या विरळ आहे.
२. २०११ च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता ३८२ व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर होती. याउलट, ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता ही फक्त २३ व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर होती.