भारत व ब्राज़ील या देशांच्या वाहतुकीच्या सोयींची तुलनात्मक टिपण्णी करा व तुमचे निष्कर्ष मांडा.
Answers
उत्तर :-
भारतातील वाहतुकीच्या सोयी :-
1. जलमार्ग :-
1. नद्या, कालवे, खाड्या, जलसाठे इत्यादींचा अंतर्गत जलवाहतुकीसाठी वापर.
2. देशाच्या एकूण वाहतूक मार्गांत अंतर्गत जलमार्गांचा केवळ 1 टक्का वाटा.
3. देशाचा मुख्य भूभाग आणि अरबी समुद्रातील व बंगालच्या उपसागरातील बेटांदरम्यान वाहतुकीसाठी खुला जलमार्गांचा वापर.
4. देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारापैकी सुमारे 95 टक्के व्यापार सागरी मार्गे.
2. रस्ते मार्ग :-
1. रस्ते मार्गाने दरवर्षी सुमारे 85 टक्के प्रवासी वाहतूक.
2. रस्ते मार्गाने दरवर्षी सुमारे 70 टक्के मालवाहतूक.
3. लोहमार्ग :-
1. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात लोहमार्गांचे महत्त्वाचे योगदान.
2. प्रवासी वाहतुकीचे महत्त्वाचे साधन.
3. मध्य भागात, ईशान्येकडील राज्यांत आणि राजस्थान राज्यात लोहमार्गांचे विरळ जाळे.
4. हवाई मार्ग :-
1. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीचा पुरेसा विकास.
2. अंतर्गत हवाई मार्गांचाही वाढता वापर.
ब्राझीलमधील वाहतुकीच्या सोयी :-
1. जलमार्ग :-
1. अॅमेझॉन नदीच्या मुखापासून ते पेरू देशातील इक्वीटाॅस या ठिकाणापर्यंत व्यापारी तत्त्वावर जलवाहतूक. या जलमार्गाने जगातील अंतर्गत जलवाहतुकीचा सर्वांत लांब पल्ला गाठणे शक्य.
2. पॅराना नदीचा जलवाहतुकीसाठी वापर.
3. किनारी भागात सागरी जलवाहतूक.
2. रस्ते मार्ग :-
1. देशातील वाहतूक मार्गांमध्ये रस्ते मार्गाचा निम्म्याहून अधिक वाटा.
2. पूर्व भागात रस्ते मार्गांचे दाट जाळे.
3. पश्चिमेकडील व उत्तरेकडील अॅमेझॉन नदीखोऱ्याच्या दुर्गम भागात रस्ते मार्गांचा मर्यादित विकास.
3. लोहमार्ग :-
1. लोहमार्गांचा मर्यादित विकास.
2. लोहमार्ग वाहतूक स्वस्त दरात उपलब्ध.
3. लोहमार्गांचा ठरावीक शहरांदरम्यान मर्यादित वापर.
4. हवाई मार्ग :-
हवाई मार्गांचा मर्यादित वापर.
निष्कर्ष :-
1. भारतात वाहतूक सोयींमध्ये पुरेसा विकास.
2. भारतातील लोहमार्ग वाहतूक महत्त्वपूर्ण.
3. ब्राझीलमध्ये वाहतुकीच्या सोयींमध्ये अल्प विकास.
4. ब्राझीलमधील रस्ते मार्ग वाहतूक महत्त्वपूर्ण.