भारत व शेजारील देशासंबंधी वर्तमानपत्रांतून येणाऱ्या बातम्या, चित्रे यांचा संग्रह करा. येथे चिकटवा.
Answers
मागील लेखामध्ये सामान्य अध्ययन पेपर-२ मधील ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ या अभ्यास घटकांतर्गत ‘भारतीय परराष्ट्र धोरण’ या उपघटकाचा आढावा घेतला. प्रस्तुत लेखामध्ये भारत व शेजारील राष्ट्रे यांमधील संबंधाचा आढावा घेऊन भारत व शेजारील देशांतील द्विपक्षीय संबंधांचे चालू घडामोडींच्या अनुषंगाने कसे अध्ययन करावे, तसेच या घटकाच्या तयारीकरिता कोणते संदर्भसाहित्य वापरावे, याबाबत चर्चा करूया. प्रत्येक देश आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये शेजारील राष्ट्रांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यास प्राधान्य देत असतो, कारण शेजारील राष्ट्रांशी असणारे संबंध देशाच्या सामरिक व गरसामरिक सुरक्षेला प्रभावित करत असतात.
भारताच्या शेजारील देशांमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका व मालदीव यांचा समावेश होतो. भारताचे या देशांशी असणारे संबंध ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातून म्हणजेच स्वातंत्र्यापासून कसे उत्क्रांत होत गेले हे जाणून घ्यावे लागेल. तसेच समकालीन परिप्रेक्ष्यामध्ये विचार करता आर्थिंक व व्यूहात्मक बाबींच्या पाश्र्वभूमीवर अभ्यासावे लागतील. भारतासमोरील क्षेत्रीय आव्हानांचा विचार करून नरेंद्र मोदी सरकारने शेजारील देशांना समान वागणूक देण्याचे धोरण अवलंबले आहे. परराष्ट्रमंत्र्यांची भूतान भेट आणि मोदींच्या मे २०१९ मधील शपथविधीकरिता ‘बिमस्टेक’ राष्ट्रांच्या (bimstec country) प्रतिनिधींना दिलेल्या निमंत्रणावरून भारताचा काळ ‘नेबरहूड फर्स्ट’कडे असल्याचे अधोरेखित होते. तरीही भारताच्या शेजारील राष्ट्रांच्या संबंधांच्या संदर्भामध्ये आधीच्या यूपीएप्रणीत सरकारच्या धोरणांचे सातत्य दिसून येते.
Answer:
I don't no answer but this answer is right