भारतीय कृषी संशोधन संस्थेमुळे शेतकर्यांचा काय फायदा झाला
Answers
Explanation:
शेतीविषयी संशोधन करणारी ही भारतातील प्रमुख संस्था असून जगातील मोठ्या कृषी संशोधन संस्थांपैकी ती एक आहे. ही संस्था ‘पुसा इन्स्टिट्यूट’ या नावाने किंवा आयएआरआय (I A R I) या आद्याक्षरांनी ओळखली जाते. हेन्री फिल्स या अमेरिकन गृहस्थांनी दिलेल्या देणगीतून ही संस्था प्रथम बिहारमधील पुसा येथे १९०५ मध्ये सुरू झाली. त्यानंतर १९३४ मध्ये भूकंपामुळे संस्थेच्या इमारतीचे फार नुकसान झाल्याने ही संस्था १९३६ साली नवी दिल्ली येथे हलविण्यात आली. सैद्धांतिक व अनुप्रयुक्त कृषी संशेधनासाठी विविध अत्याधुनिक उपकरणांनी व साधनांनी सुसज्ज प्रयोगशाळा, शेतावर प्रयोग करण्यासाठी २९६ हेक्टरचे विस्तृत क्षेत्र व उत्तम प्रशिक्षण घेतलेले शास्त्रज्ञ ही या संस्थेची वैशिट्ये आहेत. १९५८ साली ह्या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा मिळाला व आता कृषिविज्ञानाच्या विविध शाखांतील एम्. एस्सी. व पीएच्. डी. स्तरावरील पदव्युत्तर शिक्षण येथे देण्यात येते. १९८१ मध्ये संस्थेतील शिक्षकांची संख्या ३८५ व विद्यार्थांची संख्या ५४१ होती. या संस्थेची देशात १४ प्रादेशिक संशोधन केंद्रे असून १९८१ साली संस्थेतील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या सु. ५,००० होती आणि त्यात एम्. एस्सी. व पीएच्. डी. पदव्या घेतलेल्या सु. १,५०० व्यावसायिक शास्त्रज्ञांचा अंतर्भाव होता.