India Languages, asked by bhagwatugalkar, 3 months ago

भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये लिहा​

Answers

Answered by sanskarsapkal
5

Answer:

* लिखित व विस्तृत राज्यघटना - २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकृत संविधानात ३९५ कलमे [ परिशिष्टे व २२ भाग मिळून बनले होते] सद्दयस्थितीत ४६३ कलमे १२ परिशिष्टे व २५ भाग अस्तित्वात आहे.

* ताठर व लवचिक यांचा मेळ - घटनेच्या ३६८ नुसार कलमात नमूद केल्याप्रकरणी काही घटनादुरुस्ती साध्या बहुमताने तर उर्वरित दुरुस्ती विशेष बहुमताने करता येतात.

* सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य

* जनतेचे सार्वभौम होते.

* संसदीय लोकशाही प्रणालीचा स्वीकार केला आहे. भारतीय संविधानाने प्रतिनिधिक संसदीय पद्धतीचा स्वीकर केला आहे. राष्ट्रपतींच्या नावाने सर्व कारभार केला जातो. राष्ट्रपतींच्या मंत्रिमंडळाच्या स्थानानुसार वागावे लागते. पंतप्रधान हाच खरा प्रमुख ठरतो.

* संघराज्य पद्धतीचा स्वीकार - जात, वंश, धर्म, लिंग साक्षरता व इतर कोणत्याही कारणांच्या आधारे भेदभाव न करता २१ वर्षे पूर्ण असणाऱ्यांच्या मताधिकार दिला. १९८८ साली ६१ व्या घटनादुरुस्तीचे वय २१ वरून १८ वर्षे करण्यात आली.

* स्वतंत्र न्यायव्यवस्था

* मूलभूत अधिकार - भारतीय राज्यघटनेत विभाग ३ मध्ये कलम १२ ते ३५ भागात मूलभूत हक्काविषयी तरतुदी दिल्या आहेत.

* राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे - डॉ आंबेडकरांच्या मते राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ही राज्यघटनेची उदात्त वैशिष्ट्ये आहेत. भाग ४ मध्ये कलम ३६ ते ५१ मध्ये करण्यात आला आहे. मार्गदर्शक तत्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत ती नैतिकदृष्ट्या बंधनकारक आहेत.

* एकेरी नागरिकत्व - भारतीय राज्यव्यवस्था हि संघराज्य स्वरूपाची असली तरी भारतीय राज्यघटनेचे एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केला.

* स्वतंत्र संस्था मंडळे - राज्यघटनेने केवळ कार्यकारी मंडळ व कायदेमंडळ व न्यायमंडळाची निर्मिती केली नाही तर स्वतंत्र मंडळाची निर्मिती केली आहे. निवडणूक अयोग, नियंत्रक, महालेखापरीक्षक, केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्यलोकसेवा आयोग वगैरे.

* विविध राज्यघटनाचा प्रभाव - १] ब्रिटीश राज्यघटना - संसदीय लोकशाही, कायद्याची अधिसत्ता, कायदेनिर्मिती कार्यपद्धती २] अमेरिकन राज्यघटना - मूलभूत हक्कांचा लिखित स्वरूपात राज्यघटनेत समावेश, न्यायालयीन पुनर्विलोकन, महाभियोग ३] कॅनडाची राज्यघटना - प्रबळ केंद्रसत्ता असलेले संघराज्य ४] आयर्लंडची राज्यघटना - मार्गदर्शक तत्वे ५] ऑस्टेलियाची राज्यघटना - समवर्ती सूची ६] जर्मनीची वायमर राज्यघटना - आणीबाणीचे अधिकार ७] सॅन १९३५ चा कायदा - संघराज्यातील अधिकार विभागणी, राज्यपालपद, अखिल भारतीय सेवा ८] मानवी हक्काचा जाहीरनामा - मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे

Explanation:

here's your answer

PLEASE MARK ME AS BRAINLIEST ❣️

Similar questions