भारतीय सांसिीय शासन पद्धतीची वैशिष्ट्य स्पष्ट करा
Answers
Explanation:
निर्वाचित लोकप्रतिनिधींच्या सभागृहाव्दारे (संसद) चालविलेली एक शासनपद्धती. हा शासनपद्धतीचा आकृतिबंध जगातील सर्व संसदीय लोकशाही शासनपद्धतीत सर्वमान्य झाला आहे. तो मुख्यत्वे दोन तत्त्वांवर आधारित आहे. एक, विमान राजकीय पक्षपद्धतीत लोकप्रिय सार्वभौमत्व ही संकल्पना त्यात पायाभूत आहे आणि दोन, बहुसंख्याकांचे शासन या संकल्पनेशी ती निगडित आहे. ही शासनव्यस्था असणारी राज्यव्यवस्था संसदीय लोकशाही म्हणून ओळखली जाते. या लोकशाही पद्धतीत राष्ट्राच्या विधिमंडळाला-संसदेला-महत्त्वपूर्ण स्थान आहे. कार्यकारी मंडळाचे अस्तित्व संसदेतील लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्यावर अवलंबून असते परंतु काही वेळा राजकीय परिस्थितीचा परिणाम म्हणून कार्यकारी मंडळाचा वास्तविक प्रमुख
Explanation:
भारतीय संविधान कलम ७४ अन्वये राष्ट्रपतीला त्याच्या कार्यात मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी प्रधानमंत्र्याच्या नेतृत्वाखाली एक मंत्रीमंडळ असेल अशी तरतुद आहे. संविधानानुसार राष्ट्रपती हा भारताचा सर्वोच्च पण नामधारी शासक आहे, तर पंतप्रधान हा खऱ्या धर्माने वास्तविक शासक आहे.
संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये:
राष्ट्रपती हा भारतीय संसदीय शासन पद्धतीचा नामधारी प्रमुख असून सर्व सत्ता त्याच्या नावे चालते.
वास्तवात प्रधानमंत्री हा भारताचा प्रत्यक्ष प्रमुख असून संसदेच्या लोकसभा’ या सभागृहातील बहुमतातील पक्षाच्या मंत्रीपरिषदेचा तो प्रमुख असतो.
कार्यकारी मंडळ विधिमंडळला विशेषतः लोकप्रतिनिधीक सभागृहाला जबाबदार आहे. या विधिमंडळाने अविश्वाचा प्रस्ताव मंजूर केल्यास मंत्रीपरिषदेला राजीनामा देणे भाग असते.