Chemistry, asked by 9552441178, 1 month ago

भारतीय समाजातील विविधता असते तरीही एकतेची भावना दिसून येते.​

Answers

Answered by mayanksaha9125
33

Answer:

प्रस्तावना भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे ही विविधता आणि एकता यांचे पैलू आणि निर्देशांक समजून घेणे आवश्यक आहे.भारताची संस्कृती समृद्ध व विविधतेने नटलेली आहे तसेच ती सहिष्णू आणि सर्वसमावेशक आहे धर्म,जात.भाषा.वंश,पंथ,संस्कृती ,सामाजिक रूढी ,संस्कृतिक आणि उप सांस्कृतिक श्रद्धा,राजकीय तत्वज्ञान आणि विचारधारा भौगोलिक असे काही भारतातील वैविध्याचे ठळक स्त्रोत आहेत. एकात्मभावामुळे वैविध्यपूर्ण वांशिक समुदाय आणि त्यांच्या श्रद्धा जोडल्या जातात विविधतेत एकता हे सूत्र सामाजिक बांधणी जात लिंगभाव पंथ संस्कृतीयांनी धार्मिक पद्धतीतील व्यक्तीगत आणि सामाजिक फारकातून अधोरेखित होते या प्रकरणात आपण देशातील विविधता,एकता तसेच देशातील एकतेला आव्हान निर्माण करणार्‍या वांशिक,धार्मिक,प्रादेशिक,जातीय,वर्गीय आणि लिंगभावात्मक घटकांचाही विचार करणार आहोत

Answered by madhusudanbadgujar02
13

भारत हा विविधतेने नटलेला एक धर्मनिरपेक्ष देश आहे इथे विविध सामाजिक स्थांनातील लोक समाज म्हणून राहतात विविध परंपरा आणि संस्कृतीचे एकत्रीकरण झाले आहे भारतीय समाज सर्व समावेशक व लवचिक आहे डी.पी.सिंघल यांच्या India and World Civilisations या पुस्तकात विविधतेतून एकता हे सूत्र दिसून येते व त्यांच्या शब्दात सांगावयाचे झाल्यास समाजातील एकतेची शक्ति रक्तातील लालपेशी सारखी आहे हे प्रमाण संतुलित ठेवावे लागते भारतात प्रादेशिक,धार्मिक,भाषिक,धार्मिक,जातीय विविधता आहे हे एकतेचे सूत्र गुंतागुंतीचे असले तरी त्यात छेदात्मक एकतादेखील आहे विविध संस्कृती भारतात आल्या नांदल्या ,अनेक आक्रमणे झाली तरी भारताची खास संस्कृती जपली गेली श्रद्धा विविध प्रथा अथवा पद्धती स्वीकारल्या गेल्या धार्मिक ओळख नसलेल्या लोकांचा स्वीकार केला गेला जवळपास २००० वर्षापासून राजकीय एकता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशोक,हर्षवर्धन.विक्रमादित्य,अकबर हे याचे उदाहरण आहे धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्मातील लोकांच्या श्रद्धा प्रती आदर आणि सहिष्णुता बाळगणे होय सर्वधर्मसमभाव यातून हा अर्थ समजतो एकता म्हणजे एकात्मभाव किवा एकात्मभावाची जाणीव किवा एकत्रीकरण होय

Similar questions