Sociology, asked by ganeshjuttewad124, 5 months ago

भारतीय समाजावरती जाती व्यवस्थेचा प्रभाव कमी होताना दिसुन येतो त्यामागची कारणे स्पष्ट करा?​

Answers

Answered by Anonymous
37

Explanation:

भारतीय जाती व्यवस्था ही भारतीय समाजाची पायाभूत व्यवस्था आहे. प्राचीन भारतात ह्या व्यवस्थेचा विकास झाला आणि ती पुढे मध्ययुगीन काळात, आधुनिक पूर्व काळात आणि आधुनिक काळात बदलत गेली असे मानले जाते. ह्या व्यवस्थेतील मोठी संरचनात्त्मक स्थित्यंतरे मुघल साम्राज्याच्या काळात आणि ब्रिटिश साम्राज्याच्या काळात झाली आहेत असे मानले जाते.[१][२][३][४] ह्या व्यवस्थेला मात देण्यासाठी आजच्या भारतीय समाजामध्ये राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक पातळ्यांवर आरक्षणाची व्यवस्था निर्माण करण्यात आली.[५] जाती व्यवस्था दोन भिन्न संकल्पनांपासून बनलेली आहे, वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था वास्तविक पहाता ह्या सामाजिक स्तरीकरणाच्या विश्लेषणासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत

mark as brilliant

Answered by anjali5087
14

Answer:

आपल्या देशात जातिप्रथा ही फार जुन्या काळापासून प्रचलित आहे. भारताच्या घटनेत तिला एक विचित्र स्थान मिळाले आहे. काही जातींच्या नावांचा उल्लेख करणे अपमानास्पद आणि अपराधिक आहे; परंतु लेखी प्रमाणपत्रात त्या जातीचं नाव विशेषाधिकार देतं. याशिवाय आपल्या देशात एक आणखी जाती व्यवस्था आहे. तिला राजनैतिक, राजकीय किंवा राजकारणी पक्ष असं म्हणता येईल. या जातींची वैशिष्टय़े चमत्कारिक आहेत. सामाजिक जात जन्मापासून ठरते. ती मृत्यूपर्यंत बदलत नाही. आंतरजातीय लग्न केलं तरी मुलीच्या पूर्वाश्रमीची जात कोणी विसरत नाही. परंतु राजनैतिक जात रबराच्या चेंडूसारखी असते. ती कितीही टप्पे खाऊ शकते. राजनैतिक जात जन्मावर आधारित नसून हित, स्वार्थ, सत्तासुख, धनसुख आणि प्रसिद्धी या तत्त्वांचा आधार घेते. ही तत्त्वे लवचीक, परिवर्तनशील आणि सोयीस्कर असतात. एखादी बुद्धिमान (म्हणजे चतुर) व्यक्ती काळाच्या गरजेप्रमाणे आपली जात सोडून कधीही दुसऱ्या जातीत प्रवेश करू शकतो. याला कुत्सित बुद्धीचे आलोचक पक्षांतर किंवा दलबदल म्हणतात. खरं म्हणजे हा आंतरजातीय विवाह आहे. रोटी-बेटीचे व्यवहार फार जपून, नीट विचार करून करतात. आपले हित पुढील परिस्थितीत लाभ, तोटा या सर्वाचा विचार करून जात बदलतात. राजकीय आंतरजातीय विवाहांना मोठे प्रचारसुख लाभते. ज्या जातीत (ज्याला पक्ष, पार्टी असे नाव पण देतात) प्रवेश (म्हणजे विवाह) करायचा असतो त्या जातीचे ज्येष्ठ नेते जात बदलणाऱ्या व्यक्तीचे तीन ‘प’ने स्वागत करतात- पैसा, पद आणि प्रतिष्ठा.

सामाजिक जातीत विवाहाचे मुहूर्त बघावे लागतात. पूर्ण बारा महिने विवाहास उपयुक्त नसतात. परंतु राजनैतिक आंतरजातीय विवाह कधीही करण्याची सूट असते. तरी काही दिवस अशा विवाहास शुभ, फल देणारे आणि प्रसिद्धी देणारे असतात. निवडणूक जवळ आली की आंतरजातीय विवाहांना चांगले दिवस येतात. कुत्सितपणे काही आलोचक अशा विवाहांना घोडाबाजार, पाठीत सुरा भोकणे, तीन ‘प’चं लोभ, अवसरवाद अशी नावे ठेवतात. निवडणूक आणि मंत्रिमंडळनिर्मितीच्या पूर्वीचा काळ (मुहूर्त) या विवाहास अत्यंत अनुकूल असतो. जातीचे काही ज्येष्ठ नेते आपल्या पूर्ण जातीला दुसऱ्या जातीत विवाह करण्याचे औचित्य पटवून देतात. पूर्ण जात (पक्ष) बदलली तर त्याला सामूहिक विवाह म्हणून प्रसिद्धी मिळते.

सामाजिक आणि राजनैतिक जातींमध्ये आणखीही काही फरक आहेत. घटनेनं अस्पृश्यता या विचाराला अपराध मानलं आहे. परंतु राजनैतिक जातीप्रथांमध्ये अस्पृश्यता कठोरपणे पाळली जाते. ज्या जातीच्या हातात सत्ता असते ती काही जातींना अस्पृश्य घोषित करते. सामाजिक जाती प्रथेत ज्या जातींना कधी उच्च स्थान असायचं त्यांनाही अस्पृश्य घोषित करतात. अशा जातीच्या लोकांना भेटणं, मंचावर बरोबर बसणं किंवा चहापान-भोजन घेणे वज्र्य आहे. काही वर्षांपूर्वी विधान सभेच्या निवडणुका झाल्या. एका जातीला बहुमत मिळालं आणि तिच्या नेत्यांनी सरकार बनवले. इतर जातीच्या नेत्यांना हे सहन झालं नाही. विजेत्यांचे अभिनंदन करण्याचे शिष्टाचार पाळले नाहीत. ‘आमचा पराभव झाला’ हे न बोलता ‘जनतेचा निकाल स्वीकार करतो’ (नाही तरी काय केलं असतं?) असे म्हणून स्वत:चा उदारपणा दाखवला. विजातीय सरकारच्या मंत्रिमंडळाच्या शपथग्रहण समारंभात उपस्थित राहू नये, असा पक्षश्रेष्ठींकडून चाबूक (याला व्हिप म्हणतात) फिरवला जातो.

MARK ME AS BRAINLIST

Similar questions