भारतीय शिक्षणातील बद्लाविषयी माहिती लिहा
Answers
Answer:
भारतात खासगी आणि सरकारी संस्थांमधून शिक्षण दिले जाते. केंद्र सरकार, खासगी संस्था, स्थानिक संस्था, राज्य सरकारच्या संस्थांतर्फे विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. भारतातील शिक्षणाचे कार्य हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्या आधिपत्याखाली चालते. भारताच्या घटनेनुसार शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे. भारतातील विद्यापीठांवर केंद्र सरकारचे किंवा राज्य सरकारचे संपूर्ण नियंत्रण असते. भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी सुधारित शिक्षण पद्धती उपयुक्त ठरणार आहे. उच्च शिक्षण आणि संशोधनात सरकारी संस्थांनी मोठी भरारी घेतली आहे. देशात खासगी शिक्षण संस्थांचा वाटा पाच टक्के आहे, तो आता 70 अब्ज कोटी डॉलर इतका आहे.
पुरातनकाळात इ.स. 450 ते 500 वर्षांच्या दरम्यान भारतात गुरुकुल पद्धती होती. भारतात शिक्षण आणि शिक्षण पद्धतींचा विकास ब्रिटिश राजवटीत झाला. ब्रिटिशांनी महाविद्यालये आणि विद्यापीठे स्थापन करून दर्जेदार शिक्षण पद्धती भारतात अस्तित्वात आणली. कला, वाणिज्य, शास्त्र, अभियांत्रिकी, कृषी शिक्षणाची महाविद्यालये सुरू केली. प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण पद्धती अस्तित्वात आली. शिक्षण आणि संशोधन संस्था स्थापन केल्या. पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षण वेगवेगळ्या महाविद्यालयांमधून दिले जाऊ लागले. शिक्षणाचा दर्जा राखण्यावर त्यांनी भर दिला. शिक्षणक्षेत्रात शिस्त आणि उत्तम दर्जा यास महत्त्व दिले.
follow me please