भारता¸या शहरी/नागरी लोकसं´येवर टीप लिहा
Answers
उत्तर : (१) भारतातील उत्तरेकडील व ईशान्येकडील राज्यांच्या तुलनेत मध्यभागातील व दक्षिणेकडील राज्यांत शहरी लोकसंख्या तुलनेने अधिक आढळते.
(२) भारतातील उत्तरेकडील उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब इत्यादी राज्यांत व ईशान्येकडील मेघालय, असम, अरुणाचल प्रदेश नागालँड, त्रिपुरा, मणिपूर इत्यादी राज्यांत शहरी लोकसंख्येचे प्रमाण ० ते ४० टक्के आहे.
(३) भारतातील उत्तरेकडील चंदीगढ आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली (NCT) या केंद्रशासित प्रदेशांत शहरी लोकसंख्येचे प्रमाण ८१ ते १०० टक्के आहे.
(४) भारतातील मध्य भागातील गुजरात राज्यात शहरी लोकसंख्येचे प्रमाण ४१ ते ८० टक्के आहे.
(५) भारतातील मध्य भागातील दमण व दीव आणि दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांत शहरी लोकसंख्येचे प्रमाण ४१ ते ८० टक्के आहे.
(६) भारतातील दक्षिणेकडील महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा, केरळ, तमिळनाडू या राज्यात आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात शहरी लोकसंख्येचे प्रमाण ४१ ते ८० टक्के आहे.
(७) भारताच्या लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात शहरी लोकरसंख्येचे प्रमाण ६१ ते ८० टक्के आणि अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशात शहरी लोकसंख्येचे प्रमाण २१ ते ४० टक्के आहे.
(८) भारतातील शहरी लोकसंख्येत सातत्याने वाढ होत आहे.