भारतीय वन्य प्राण्यांचे संरक्षण दसवर्धनासाठी उपाययोजना
सांगा
Answers
Explanation:
वन्यजीवांचे रक्षण : पर्यावरणातील विविधता टिकवून ठेवणे हे वन्य जीवांच्या रक्षणाचे परंपरागत उद्दिष्ट आहे. वन्य जीवांच्या बरोबरीने पृथ्वीतलावर मानव गुण्यागोविंदाने नांदत आला आहे परंतु गेल्या २-३शतकांत माणसाने वन्य जीवांची प्रमाणाबाहेर हत्या केली अन्नासाठी त्यांच्याशी स्पर्धा करू लागला तसेच प्रदूषणामुळे त्यांच्या प्रजोत्पादनास प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली व त्यांच्या राहण्याच्या जागा नष्ट होऊ लागल्या. अशा रीतीने वन्य जीवांना जीवनसंघर्षात टिकून राहणे अवघड झाले, कारण त्यांच्यापुढील या अडचणींवर त्यांना मात करता येणे शक्य नाही. परिणामी पुष्कळ जीवजाती नष्ट किंवा विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे जगभराच्या विचारवंतांनी विज्ञानयुगाच्या सुरुवातीस होती तशी विविधता पूर्ण जीवसृष्टी परिरक्षित किंवा पुनःस्थापित करण्याकडे आपले लक्ष वळविले.
विध्वंसक किंवा अनाकर्षक गोष्टींचे परिरक्षण कशासाठीकरावयाचे? याचे साधे व सोपे उत्तर म्हणजे जगात आपल्याभोवती असलेल्या विविधतेमुळे आपल्या आनंदात भर पडत असते, हे होय. घनदाट जंगलात राहणारा वाघ किंवा दक्षिणेकडील शीत महासागरांतील निळा देवमासाही कदाचित आपल्याला प्रत्यक्ष पहावयास मिळणार नाही तथापि त्या भागांत त्यांचे अस्तित्व आहे, या कल्पनेनेच आपल्याला आनंद मिळतो नाहीतर आपण या गोष्टींना मुकलो असतो.
जीवांमधील विविधता टिकविण्याची व्यावहारिक कारणेही अधिक सुस्पष्ट होऊ लागली आहेत. विशिष्ट प्राणी व वनस्पती मग त्या अपरिचित व दुर्लक्षित असल्या, तरी शास्त्रीय व आर्थिक दृष्ट्याअत्यंत महत्त्वाच्या आहेत. काही जीवजाती प्रयोगशाळांमध्ये अत्यावश्यकच झालेल्या आहेत. त्यांच्यामुळे मानवाच्या महत्त्वाच्या शरीरक्रिया वैज्ञानिक प्रक्रियांवर प्रकाश पडला आहे आणि त्यामुळे रोग प्रतिबंध व उपचार यांचा मार्ग सुकर झाला आहे. रानटी बैलासारख्या जातींचा उपयोग करून पशुधनामध्ये नवीन वाणांची पैदास करणे शक्य झाले आहे.
वन्यजीवांना असलेले धोके : अगदी १९८०पर्यंत वन्य जीवांचे रक्षण सापेक्षतः सोपे काम होते. प्राण्यांना धोकादायक ठरू शकणारी कारणे पूर्वी गंभीर स्वरूपाची होती तरी पण ती कमी होती व सामान्यतः कमी तीव्र होती. मोठ्या आकारमानांच्या किंवा दिमाखदार पिसाऱ्याच्या अधिक आकर्षक प्राण्यांच्या हत्येस त्यांची ही वैशिष्ट्ये कारणीभूत ठरली तर अन्य काहींवर इतर लक्षणांमुळे ही वेळ आली. उदा., विशेष परिस्थितीत बदल झाल्यावर त्यांना याचा त्रास होऊ लागला. मोठा ⇨ऑक पक्षी आपले पंख फक्त पोहचण्यासाठी वापरी त्याला दूरच्या उत्तर सागर प्रदेशात कमी शत्रू होते पणजहाजबांधणीच्या नव्या तंत्रांमुळे माणूस तेथे पोहोचू शकला. त्यामुळेऑक पक्ष्यांची मोठ्या प्रमाणावर हत्या झाली. उडू न शकणाऱ्या ⇨डोडोया पारव्यासारख्या पक्षाच्या बाबतीतही असेच घडले आणि आता तो हिंदी महासागरातील फक्त काही बेटांवरच आढळतो. तो सतराव्या शतकात इतर बेटांवर निर्वंश झाला कारण यूरोपियन लोक व परभक्षी (दुसऱ्या सजीवांवर उपजीविका करणारे) पाळीव सस्तन प्राणी त्या बेटांवर पोहोचले होते. त्याचप्रमाणे बंदुका विपुल प्रमाणात उपलब्ध झाल्यावर मोठ्या कळपांतून राहणाऱ्या गव्यांची मोठ्या प्रमाणात हत्या झाली. फक्त इंडोनेशियात आढळणाऱ्या कोमोडो ड्रॅगन याची संख्या झपाट्याने घटली. कारण हरणे व रानडुकरे या त्याच्या भक्ष्यांची माणसाने मोठ्या प्रमाणावर शिकार केल्याने त्याची संख्या घटली.
पुष्कळ बाबतींत शिकारीला प्रतिबंध करणारे कायदे करून किंवाअशा धोक्यात असलेल्या जीवजातींसाठी स्वतंत्र संरक्षित प्रदेश राखून ठेवून ही समस्या सोडविता येते. अशी पावले उचलल्यामुळे छंद म्हणून शिकार करणे हा वन्य जीवांना धोका राहिलेला नाही. शासनाने हरिण, शिकारी पक्षी व विशिष्ट दुर्मिळ मासे यांच्या शिकारीवर असे कडक निर्बंध घातलेले आहेत. आफ्रिकेतील देशांनी एकेकाळी मैदानी प्रदेशांत गर्दी करणारे हत्ती, सिंह, हरणे यांच्या शिकारीवर असे निर्बंध घालणारी पावले उचलली आहेत.
स्वार्थी वृत्ती : विसाव्या शतकातील वाढत्या लोकसंख्येच्या विस्फोटाचा वन्य प्राण्यांच्या अस्तित्वावर अभूतपूर्व ताण पडत आहे. माणसाची अवाजवी फायदा कमविण्याची स्वार्थी वृत्ती हे वन्य जीवांची संख्या घटण्याचे एक प्रमुख कारण आहे. उदा., विसाव्या शतकात अनेक देशांनी अद्ययावत जहाजांच्या ताफ्यांनी महासागरांत सर्वत्र देवमाशांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली. आवडते खाद्य पदार्थ, ऱ्हासाची गुंतागुंत वाढत आहे.
Explanation:
भारतीय वन्य प्राणियों के संरक्षण संवर्धनासाठी उपाय योजना सांगा