India Languages, asked by hemlatanehete89, 7 months ago

भाषेचे महत्त्व माहिती​

Answers

Answered by umeshkumar703
3

Answer:

please follow me please and like this answer please mark me in brain list please now

Explanation:

मराठी हि एक खूप सुंदर भाषा आहे जी मुख्यता महाराष्ट्रात आणि थोड्या प्रमाणात गोवा इथे बोलली जाते. मराठी हि भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी भाषा हि भारतात सगळ्यात जास्त बोलली जाणारी चौथी भाषा आहे. मराठीच्या मुख्य पोटभाषा आहेत,त्या म्हणजे वऱ्हाडी, कोळी, मालवणी आणि कोंकणी. मराठी भाषा २००० वर्षांपासून अस्तित्वात आहे, म्हणूनच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न चालू आहे. आपण मराठी भाषा दिवस २७ फेब्रुवारी ला साजरा करतो. त्यादिवशी आपले लाडके साहित्यकार कुसुमाग्रजांचा वाढदिवस असतो.

११८७ सी.ई. नंतर यादव काळात मराठीचा वापर वाढला. यादव राजे अगोदर कन्नड आणि संस्कृत भाषा वापरत असत. १४ व्या शतकाच्या शेवटी पर्यंत मराठी वर्णलेखनाची प्रमुख भाषा झाली होती. असे मानले जाते कि यादवांनी मराठीला प्राधान्य दिले कारण ते मराठी बोलणाऱ्या प्रजेशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करत होते. यादव राजवटीतील शेवटच्या तीन राज्यांच्या काळात ज्योतिष, आयुर्वेद, पुराण, वेदांत वर मराठी साहित्य गद्य आणि काव्य रूपात तयार करण्यात आले.

आज मराठी ज्या रूपात जिवंत आहे ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, त्यांच्या काळात मराठीला खरे महत्व प्राप्त झाले. शासकीय कामकाज आणि बोली भाषा म्हणून मराठीचा विस्तार झाला. मराठी भाषेवरील पर्शिअन भाषेचा प्रभाव या काळातच कमी झाला. जसा जसा मराठी साम्राज्याचा विस्तार झाला तसा मराठीचा ही विस्तार झाला. या काळात मराठी ही मोडी लिपीत लिहली जात असे.

बराच वर्षांपासून इंग्रजीमाध्यमातून शिक्षण प्रणाली आल्यापासून मराठी माध्यमातील शिक्षणाला महत्व देणे कमी झालेले दिसत आहे. मराठी भाषेतील साहित्य कविता , नाटके , प्रवास वर्णने, निबंध , लघुनिबंध ह्यांचा दर्जा बघितला तर अतिशय गर्व वाटतो. मराठी साहित्यातील साहित्यकारांनी आपल्यासाठी अतिशय मोलाचा ठेवा ठेवलेला आहे ते आपण मुलांना वाचण्यास प्रवृत्त करायला हवे. आपल्या महाराष्ट्राला बऱ्याच थोर संतांचा ठेवा लाभला आहे . संत ज्ञ्यानेश्वर ह्यांनी “ज्ञानेश्वरी” सारखा ग्रंथ लिहिला आहे. “पसायदान” , संत रामदासस्वामी ह्यांनी “मनाचे श्लोक” लिहिले आहे. ह्या दर्जेदार लिखाणाला न विसरता ह्याचे अध्ययन , पठन , चिंतन करायला हवे.

मराठी हि एक प्राचीन आणि सुंदर भाषा आहे, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे. बदलत्या काळात इंग्रजी सुद्धा शिकली पाहिजे, हिंदी सुद्धा बोलावी लागते पण जो गोडवा मराठीत आहे तो कशातच नाही. आपण वेळेनुसार बदलले पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की आपण आपले मूळ, आपली भाषा, मराठी संस्कृती विसरली पाहिजे. यासोबत आपण हे पण लक्षात ठेवले पाहिजे कि आदर, प्रेम हे परस्पर असते, म्हणजे दोन्ही बाजूंनी ते असावे लागते. जर आपल्याला भारतात, जगात मराठीला आदर आणि प्रेम मिळवून द्यायचे असेल तर आपल्याला दुसऱ्या भाषेंचा सुद्धा आदर केला पाहिजे.

Similar questions