भाषेची नियमव्यवस्था सांगून मराठी लेखन विषयक नियम सोदाहरण लिहा ?
Answers
मराठी ही आपली मातृभाषा आहे. मराठी भाषा तिच्या वैविध्य रूपाने समृद्ध आहे. मराठी भाषेच्या बोलण्यात गोडवा आहे. परंतु या भाषेत बोलायचे किंवा लिखाण करायचे झाल्यास शुद्ध व्याकरणाचा अभ्यास करणे व त्याचे नियम पाळणे गरजेचे असते. भाषेची वर्णमाला, संधी, शब्दांच्या जाती, लिंग, वचन, वाक्याचे प्रयोग, विभक्ती, विरामचिन्हे यांचे नियम व मांडणी सविस्तरपणे ज्ञात असावयास हवी. भाषेची नियमव्यवस्था वरील प्रमाण भाषेवर अवलंबून आहे. मराठी भाषा बोलताना व लिहिताना त्यात मराठी शब्दांचा वापर करण्यात यावा. कुठलेही परकीय भाषेतील शब्द किंवा बोलीभाषेतील शब्दांचा वापर करणे म्हणजे मराठी भाषेचा अपमान होईल, म्हणूनच आपल्या मराठी भाषेच्या लेखनात प्रमाण भाषा वापरली पाहिजे जेणेकरून साहित्य निर्मिती किंवा वैचारिक स्वरूपाचे लेखन चांगलेहोईल.
"मराठी भाषा लेखनाचे काही नियमही आहेत त्यालाच शुद्धलेखन असे म्हणतात" शुद्धलेखन हा एक व्याकरणाचाच भाग आहे. परिपूर्ण शुद्धलेखनाशिवाय मराठी भाषेचे लेखन म्हणजे अर्धवट शिक्षणाचे लक्षण होय. हे नियम खालीलप्रमाणे आहेत.
अ) अनुस्वार यासंबंधीचे नियम :-
अनुस्वार यासंबंधीचे नियम:
१) ज्या अक्षराचा उच्चार नाकातून येतो त्या अक्षराच्या डोक्यावर अनुस्वार द्यावा.
उदाहरणार्थ:- आनंद,आंबा, पंगत, वंदना इत्यादी.
२) नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रुपांवर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.
उदाहरणार्थ:- मुलांना, त्यांना,सर्वांना, झाडांवर, बालकांवर, इत्यादी.
३) शब्दातील अक्षरांवर अनुस्वार देऊ नयेत.
उदाहरणार्थः- लाकूड, काटा, पाच, गाव, नाव इत्यादी.
ब) हस्व व दीर्घ संबंधी नियम (अन्त्य अक्षरे)
१) एकाक्षरी शब्दातील इ-कार किंवा उ-कार दीर्घ उच्चारला जातो म्हणून तो नेहमी दीर्घ लिहावा. उदाहरणार्थ:- मी, ही, ती, की पी, ऊ,इ, तू इत्यादी . २) शब्दाच्या शेवटी येणार इ -कार किवां उ-कर उचारणानुसार दीर्घ लिहावा.