India Languages, asked by gauravbeskar2016, 1 year ago

भाषेची नियमव्यवस्था सांगून मराठी लेखन विषयक नियम सोदाहरण लिहा

Answers

Answered by rishilaugh
89

भाषेची नियमव्यवस्था सांगून मराठी लेखनविषयक नियम सोदाहरण लिहा .

            मराठी ही आपली मातृभाषा आहे. मराठी भाषा तिच्या वैविध्य  रूपाने समृद्ध आहे.  मराठी भाषेच्या बोलण्यात गोडवा आहे. परंतु या भाषेत बोलायचे किंवा लिखाण करायचे झाल्यास शुद्ध व्याकरणाचा अभ्यास करणे व त्याचे नियम पाळणे गरजेचे असते.  भाषेची वर्णमाला, संधी, शब्दांच्या जाती, लिंग, वचन, वाक्याचे  प्रयोग, विभक्ती, विरामचिन्हे  यांचे नियम व मांडणी  सविस्तरपणे ज्ञात  असावयास हवी.  भाषेची नियमव्यवस्था वरील  प्रमाण भाषेवर अवलंबून आहे. मराठी भाषा बोलताना  व  लिहिताना  त्यात मराठी शब्दांचा वापर करण्यात यावा. कुठलेही परकीय भाषेतील शब्द किंवा बोलीभाषेतील शब्दांचा वापर करणे म्हणजे मराठी भाषेचा अपमान होईल, म्हणूनच आपल्या मराठी भाषेच्या लेखनात प्रमाण भाषा वापरली पाहिजे जेणेकरून साहित्य निर्मिती किंवा वैचारिक स्वरूपाचे लेखन चांगलेहोईल.  

                    "मराठी भाषा  लेखनाचे काही नियमही आहेत त्यालाच शुद्धलेखन असे म्हणतात" शुद्धलेखन हा एक व्याकरणाचाच भाग आहे. परिपूर्ण शुद्धलेखनाशिवाय मराठी भाषेचे लेखन म्हणजे अर्धवट शिक्षणाचे लक्षण होय. हे नियम खालीलप्रमाणे आहेत.

अ) अनुस्वार यासंबंधीचे नियम:-

१) ज्या अक्षराचा उच्चार नाकातून येतो त्या अक्षराच्या  डोक्यावर अनुस्वार द्यावा.

उदाहरणार्थ:- आनंद,आंबा, पंगत,  वंदना इत्यादी.

२) नामांच्या  व सर्वनामांच्या  अनेकवचनी सामान्य रुपांवर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.

उदाहरणार्थ:- मुलांना, त्यांना,सर्वांना, झाडांवर, बालकांवर, इत्यादी.

३) शब्दातील अक्षरांवर अनुस्वार देऊ नयेत.

उदाहरणार्थ:- लाकूड, काटा, पाच, गाव, नाव इत्यादी.

ब)  ऱ्हस्व व   दीर्घ संबंधी नियम (अन्त्य अक्षरे)  

१)  एकाक्षरी शब्दातील इ-कार किंवा उ-कार दीर्घ उच्चारला जातो म्हणून तो नेहमी दीर्घ लिहावा.  

उदाहरणार्थ:- मी, ही, ती, की , पी , ऊ ,इ , तू  इत्यादी .  

२) शब्दाच्या शेवटी येणार इ -कार किवां उ-कर उचारणानुसार दीर्घ लिहावा.  

उदाहरणार्थ :-  भाऊ, राखी , काजू, पाणी , चटई , वाटी  इत्यादी .  

३)  काही तत्सम इ-कारान्त किंवा उ-कारान्त शब्द मराठीच्या स्वभावानुरूप दीर्घ लिहावेत.  

उदाहरणार्थ:- कवी, प्रीती, गती, पशु इत्यादी.  

४) सामासिक शब्दातील पहिले पद  इ-कारान्त किंवा उ-कारान्त तत्सम शब्द असेल तर ते ऱ्हस्वच लिहावे.  

उदाहरणार्थ:- वायुपुत्र, गुरुदक्षिणा, रविवार, पशुपक्षी, कविराज, हरिकृपा इत्यादी.  

५) सामासिक व साधित शब्दातील पहिले पद इ-कारान्त किंवा उ-कारान्त असेल तर ते दीर्घ  लिहावे.  

उदाहरणार्थ:-  गौरीनंदन, वधूपरीक्षा, भगिनीमंडळ, गौरीहर इत्यादी.

६) तत्सम अव्यये  नेहमी ऱ्हस्व लिहावेत.  

उदाहरणार्थ:-  नि, आणि, परंतु,  किंतु,  अति,  इत्यादी  

क) ऱ्हस्व दीर्घ नियम (उपान्त्य अक्षरे)

१)  मराठी शब्दातील पूर्वीचे इ-कार किंवा उ-कार दीर्घ असतात.  

उदाहरणार्थ:-  दूध, फूल , मूल , तूप , बहीण  इत्यादी.  

२) तत्सम शब्दातील अकारान्तपूर्वीचे  इ-कार किंवा उ-कार ऱ्हस्व असतात.  

उदाहरणार्थ:-  मंदिर, शिव, बुध, प्रिय, विष इत्यादी .

ड ) विरामचिन्हे:- लिखाणातील भाव स्पष्ट होण्यासाठी विविध विरामचिन्हांचा वापर करावा लागतो.  

१) पूर्णविराम (.)  वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी.  

उदाहरणार्थ:-  राम शाळेत जातो.  

२) अर्धविराम (;)  दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांना जोडलेली असतात तेव्हा.  

उदाहरणार्थ:-   सिनेमाला जायचे होते; अचानक पाऊस आला.  

३) स्वल्पविराम (,)  एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास.  

उदाहरणार्थ:- आज वर्गात राम, सीता, गीता,हरी,शाम  हजर नव्हते.  

४) अपूर्णविराम (:) वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास.  

उदाहरणार्थ :-  शब्दांच्या आठ जाती आहेत त्या पुढीलप्रमाणे:

५) प्रश्नचिन्ह (?) प्रश्नार्थक प्रश्न वाक्याच्या शेवटि वापरतात.  

उदाहरणार्थ:- खोखो चा अंतिम सामना केव्हा आहे?

६) उद्गारवाचक चिन्ह (!) उत्कट भावना व्यक्त करतांना .  

उदाहरणार्थ:- छान, हीच खरी देशसेवा आहे!

७) एकेरी अवतरण चिन्ह ( '  ' ) एखाद्या शब्दावर किंवा वाक्यावर जोर द्यावयाचा असेल तेव्हा.  

उदाहरणार्थ:-  'दील्ली ' भारताची राजधानी आहे.

८) दुहेरी अवतरण चिन्ह ( "   " ) बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द दाखविण्यारिता.  

उदाहरणार्थ :- लाला बहाद्दुर शास्त्रीजी यांनी " जय जावं जय किसान " हा मंत्र दिला.

        वरिलप्रकारे भाषेची नियमव्यवस्था व मराठी लेखन विषयक नियम सोदाहरणसहित स्पष्ट करता येईल.



Anonymous: Check inbox
knligma: nee mama thadika
Answered by deepakkamble1965
12
  1. ya this answer is correct
Similar questions