भाषेचे प्रयोजन कसे केले जाते सांगून विविध वनक्षेत्रातील तिच्या उपयोजनाचे स्वरूप लिहा.
Answers
Answer:
मूळ उत्तर:
मानववंशविज्ञान समाजभाषाविज्ञान आणि मनोभाषाविज्ञानाच्या अभ्यासातून जे निष्कर्ष निघतात त्यांचे उपयोजन करणारे शास्त्र म्हणजे उपयोजित भाषाशास्त्र होय. भाषाभ्यासाचे संशोधनातून जे निष्कर्ष निघतात त्याचे उपयोजन कसे केले पाहिजे. उपयोजन करतांना त्याची कार्यपद्धती कशी असली पाहिजे त्याचा विचार भाषाशास्त्रात होत असतो. उदा. शालेय महाविद्यालयीन शिक्षण कोणत्या भाषेत द्यावे. शासकीय व्यवहाराची भाषा कोणती असावी. संगणकाच्या शिक्षणात माध्यम म्हणून कोणती भाषा वापरली पाहिजे. अशी सर्व प्रश्नोत्तरे ही उपयोजित भाषाविज्ञानाच्या संबंधी वापरली जातात. भाषेचा अभ्यास करतांना लहान मुले बोलतात ती प्रथम भाषा, त्यानंतरची जराशी प्रगत द्वितीय भाषा त्यापुढे तृतीय भाषा अशी वर्गवारी भाषाभ्यास करतांना केली जाते. अशी भाषा शिकतांना भाषेची सामाजिक पार्श्वभूमी, भाषा बोलणा-यांचे वय, भाषा शिकण्याचा हेतू , भाषेचे व्याकरण, नियम, भाषेच्या होणाऱ्या चुका वगैरेंचा विचार उपयोजित भाषाशास्त्रात केला जातो.स्थळ,वळ व काळानुरुप भाषेत जो बदल घडवुन येणारा भाषा बदलाचा अभ्यास केला जातो.
वरील व्याख्येनुसार भाषा ही संकेतव्यवस्था असते, असे आपण पाहिले. याचा अर्थ आशय व्यक्त करण्यासाठी भाषेमध्ये काही ठराविक खुणा वापरल्या जातात.जेव्हा भाषावैज्ञानिकांनी मानवी भाषांचा विचार केला, तेव्हा त्यांना या खुणा प्रामुख्याने ध्वनिरचनांच्या स्वरूपात आढळल्या. सुट्या ध्वनींच्या माध्यमातून नव्हे तर त्यांच्या रचना करूनच अर्थ व्यक्त होत असतो. त्याचे कारण असे की माणूस व्यावहारिकदृष्ट्या वेगळे ओळखू येणारे किती ध्वनी उपयोगात आणू शकतो, याला मर्यादा आहेत. त्याला व्यक्त करायचे असणारे अर्थ मात्र अमर्याद आहेत. त्यामुळे मोजक्या ध्वनींच्या अनेक रचना करण्याचे तंत्र मानवी भाषेने विकसित केले असे म्हणता येईल