१) भाषेची सर्जनशीलता म्हणजे काय? ते स्पष्ट करा.BA.BCOM
Answers
भाषेची सर्जनशीलता म्हणजे काय? भाषेची एक नियमव्यवस्था असते. अशा नियमयवस्थेला
"व्याकरण म्हणतात. एकदा ही नियमव्यवस्था आत्मसात झाली. की माणूस असंख्य भाषिक रचना करू शकता. तो सर्व भाषा अनुकरणातून शिकत नाही. पूर्वी न ऐकलेल्या भाषिक रचना त्याला समजतात व तो स्वतः विविध रचना करू शकता. या दृष्टीन भाषा ही निर्मितशील किंवा सर्जनशील असते असे म्हटले जाते. या नियमव्यवस्थेचे उपयोजन प्रत्यक्ष भाषाव्यवहार करताना केले जाते. आपण बोलती, लिहितो. वाचता अशा कृती करताना भाषेच्या नियमव्यवस्थेचा वापर केला जातो. हा वापर बहुस्तरीय असतो. आग औपचारिक व अनौपचारिक पातळ्यांवर एकसारखे बोलत नसतो. आईशी बोलताना होणारे भाषिक उपयोजन व अनोळखी व्यक्तीशी बोलताना होणार भाषिक उपयोजन वेगवेगळे असते. मालकाशी व नौकराशी आपले सामाजिक संबंध वेगळे असतान: म्हणून त्या प्रत्येकाशी बोलताना भाषा वापरण्याची पद्धती बदलली जाते. मातृभाषेत आपले हे बोलणे सवयीचे होते. त्यामुळे हा बदल आपल्या लक्षात येताच असे नाही. परंतु अन्य भाषा शिकताना मात्र सामाजिक संबंधांबरोबर भाषेचा वापर कसा बदलता है काळजीपूर्वक शिकावे लागते. लेखनातली भाषा बोलण्यातली भाषा ही वेगळी असते. बोलणं हे सामान्यतः अनौपचारिक व सहज असते. तर लेखन हे औपचारिक असते. व्यक्तीचा सामाजिक दर्जा सांस्कृतिक स्थान, जात, प्रदेश, वय, लिंग, शिक्षण प्रसंग यांचाही भाषिक उपयोजनावर परिणाम झालेला दिसतो. एकच एक मराठी भाषा बोलत असली तरी मुलांची भाषा, साहेबाची भाषा. शिकलेल्याची भाषा, अडाण्याची भाषा अशी उपयोजनकर्त्यानुसार ती बदलत असते. भाषा ही अशी लवचीक असते. सर्जनशील असते. आपण वाकवावी तशी वाकते. तबल्यावर वाटे आपटून ध्वनी निघतो. पण तवलजी बोटांची अशी काही फिरत जमवता की, त्यातून प्रसन्न ध्वनिलहरी निर्माण होतात. भाषेचाही असा चाखंदळ आणि सर्जन वापर होतो तेव्हा काव्य, नाट्य असे वाङ्मय निर्माण होते. म्हणी, उखाणे निर्माण होतात.