Hindi, asked by navnathghawate924, 9 months ago

भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात असेल दोघांचाही सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं दिलेल्या काव्यपंक्ती चे रसग्रहण करा ​

Answers

Answered by varadad25
125

उत्तर :-

'भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात

हातात हात असेल दोघांचाही.'

आशयसौंदर्य : कवयित्री नीरजा यांनी 'आश्वासक चित्र' या कवितेमधून स्त्री - पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासकरीत्या कसे साकारले जाईल याची दिशा खेळणारा लहान मुलगा व मुलगी यांच्या प्रतीकांतून योग्यपणे दाखवली आहे.

काव्यसौंदर्य : भातुकलीतले जग हे स्वप्नाळू असते. त्यातला संसार हा लुटुपुटीचा असतो. मोठेपणी प्रत्यक्ष संसारातील जबाबदाऱ्या या वास्तववादी असतात. त्यामुळे भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात प्रवेश करताना सत्य स्वीकारावे लागेल. स्त्री - पुरुष यांची परस्परांना स्नेहाची साथ असेल, तर समजूतदारपणाने व सहकार्याने ते जगात वावरतील. स्त्री - पुरुष परस्परांची कामे मिळून करतील, असे भविष्यकालीन आशावादी चित्र उपरोक्त ओळीतून साकारले आहे.

भाषिक वैशिष्ट्ये : या ओळींमधून लहान मुलांच्या खेळातून विचारगर्भ चिंतनाची प्रचिती येते. कवयित्रींनी साध्या विधानातून विचारगर्भ आशय थेट मांडला आहे. 'स्त्री - पुरुष समानता' हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय सहजपणे व्यक्त झाला आहे. भविष्यकालीन दोघांमधील सामंजस्याचे लोभस परंतु प्रगल्भ चित्र 'हातात हात असेल' या वाकयखंडातून प्रत्ययकारीरीत्या प्रकट झाले आहे. स्वप्न आणि सत्य यांची योग्य सांगड तरल शब्दांत व्यक्त झाली आहे.

तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.

Answered by nandinidandade35
16

I think it must have worked for you, if you like it then do like it

Attachments:
Similar questions