India Languages, asked by DHRUVNARAYAN, 4 months ago

भेटी लागी जीवा कवितेचे रसग्रहण करा​

Answers

Answered by kalivyasapalepu99
1

मुक्तहस्त चित्र काढताना जसं डावं उजवं यातला समतोल साधत काढावं लागतं तसं अगदी जेवणाचं पान वाढताना सुद्धा! आपल्या आधीची पिढी यात इतकी तरबेज होती की चुकून भाजी डावीकडे वाढणार नाहीत आणि चटणी उजवीकडे वाढणार नाहीत, अपवाद अशुभ कार्याचा!  एकूण काय आपल्या भारतीय जेवणात भाज्या, कोशिंबीरी, चटण्या, उसळी सगळ्यालाच महत्त्व आहे.

माझं माहेर कर्नाटकातलं. म्हणजे वडील तिकडून मुंबईत स्थलांतरीत झालेले. आणि आई कोकणातली. त्यामुळे आमच्या घरी दोन्हीकडचे पदार्थ होत. कर्नाटकात कोरड्या चटण्यांचं भारी कौतुक. ते माझ्यात पण आलंय आणि पुढे मुलाच्यात पण. खूप छोटा असल्यापासून त्याला कढीपत्त्याची कोरडी चटणी आणि तूप हे कॉम्बिनेशन आवडायचं. आता शेंगदाण्याची चटणी आणि तूप. काहीही म्हणा मस्तच लागतं हे सगळं. आमच्या माहेरच्या घरी पूर्वी डायनिंग टेबलवर एक ट्रे असायचा. मीठ, कारळ्याची चटणी/खुरासणी, आळशीची चटणी, शेंगदाणा चटणी बिना लसणीची आणि कोरड्या खोबर्‍याची लसूण चटणी शिवाय खास गावावरुन खलबत्त्यात खलून तयार केलेला कांदा लसूण मसाला, कढीपत्त्याची चटणी हे पदार्थ कायम असायचे. खरे तर हे तयार असेल तर चटकन एक गरम भाकरी मिळाली तरी मस्त न्याहारी होईल. उन्हाळ्यात कांदा कैरीची ओली चटणी बनायची..अहा...! आणि अगदी श्राद्धपक्षाला आमसुलाची चटणी. कोणी काहीही म्हणा ही माझी एकदम आवडती चटणी.  

ती एकदा पितृपंधरवड्यातच मिळायची. शिराळ्याच्या दोडक्याच्या सालांची चटणी म्हणजे भाजीला सबस्टिस्टिट्युट. बाकी इडली असेल तर नारळाची चटणी, आणि मुळगा पोडी, भेळेच्या शेवपुरीच्या वेगळ्या चटण्या. आमच्या सासरी एक नवीन प्रकार खाल्ला. तिखटी म्हणतात त्याला. नारळ, लाल मिरच्या, लसूण आणि जिरं वाटून त्याची चटणी करायची आणि तांदळाच्या मऊसूत भाकरीसोबत... स्वर्गसुख!

आपण केवळ चव आणि तोंडीलावणं या दृष्टीने चटण्यांचा विचार करीत असतो. परंतु मागे डॉ ओझ शो मध्ये पाहिलं फ़्लॅक्स सीड्स वा आळशी खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे आणि ते मिल्कशेक मध्ये घालून हेल्दी शेक बनवता येईल अशी चर्चा चालली होती. मला कसंसंच झालं. गोड पदार्थात वा दुधात हे मिसळलं तर विरुद्धाशन नाही का होणार त्यापेक्षा चटणी बरी की. असंच एकदा केस गळतायत म्हणून डॉक्टर कडे गेले तर ती म्हणाली काळे तीळ भाजून कुटून मधातून घेत जा. फ़ार भयंकर लागलं ते. त्याऐवजी काळ्या पांढर्‍या तीळाची चटणी बरीय! नारळ, तीळ, भुईमूग ही तेल देणारी आहेत, म्हणून आहारात समावेश असावा हे लॉजिकल आहे. टोमॅटो सॉस सहज उपलब्ध झाला आणि हळूहळू बाटलीबंद सॉसने घरगुती चटण्या विस्मृतीत गेल्या.

परदेशात मी काही वेगळ्या प्रकारच्या चटण्या शिकले. त्यातला खूप आवडला तो साल्सा. कांदा, टोमॅटो, आलापेनियो म्हणजे हिरव्या जाडसर मिरच्या, लसूण आणि भरपूर कोथिंबीर विनेगर घातलेला साल्सा, कोणत्याही चिप्सबरोबर छान लागतो. हे मेक्सिकन लोक खाण्याबाबत आपल्या सारखेच हौशी आणि चांगले तिखटखाऊ. यात कधी आंबा घालतील, कधी पिचेस घालतील, पण मस्त चव येते. एक हिरवा साल्सा पण करतात त्याला साल्सा वेर्दे म्हणतात. ग्वाकमोली/वाकामोली हा पण एक वेगळा पदार्थ. अवोकॅडो नावाच्या फ़ळाच्या गरापासून ही चटणी बनवतात. रुचि वृद्धिंगत करण्यासाठी उत्तम! सध्या तर कशाबरोबर पण शेजवान चटणी चालतेय. असो फ़ास्ट वर्क , स्मार्ट वर्कच्या जमान्यात असे पदार्थ आपल्याला खूप उपयोगी पडतात. चाटून पुसून साफ़ केली जाते ती चटणी अशी व्युत्पत्ती केली तर चटणी करण्यात गृहिणीचे कौशल्य पणाला लागते असे म्हणायला हरकत नाही.

Similar questions