Geography, asked by Ujjwal9699, 10 months ago

‘बहुउद्देशीय धरण प्रकल्प’ या विषयी माहिती मिळवा.

Answers

Answered by vaishnavi2001
212

महाराष्ट्र राज्यातल्या ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील साजवली गावाजवळ बांधलेले आणि मुंबईस पाणीपुरवठा करणारे हे एक महत्त्वाचे धरण असून केवळ पाणीपुरवठाच नव्हे तर बहुउद्देशीय असा हा भातसा प्रकल्प आहे. हे धरण भातसा व चोरणा या नद्यांच्या संगमावर बांधले आहे. चोरणा ही छोटी नदी भातसा नदीची उपनदी आहे. धरण शहापूर या गावापासून २० किलोमीटरवर आहे.

धरणाचे बांधकाम १९६९मध्ये सुरू झाले. सुरुवातीला कामाचा वेग संथ होता. जेव्हा काम सुरू झाले त्यावेळी १४ कोटी रुपये एवढाच खर्चाचा अंदाज होता. इ.स.१९७३पर्यंत कामाची गती फार कमी होती. तेव्हा पाटबंधारे खात्यामार्फत हे काम हाती घेण्यात आले. डिसेंबर १९८३पर्यंत हया प्रकल्पाचा खर्च ८० कोटी रुपयांवर तर १९९४-९५पर्यंत हा खर्च ३५८ कोटी रुपयांवर पोहचला. २००० सालापर्यंत काम पूर्णावस्थेला आले.

मुंबई शहराचा ५० टक्के(१३५ कोटी लिटर) पाणीपुरवठा भातसा धरणातून होतो. विहार, तानसा, आणि वैतरणा या धरणांतून उरलेले ५० टक्के पाणी उचलले जाते. महाराष्ट्रातील दगडी धरणांमध्ये भातसा धरण सर्वात उंच आहे.

बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम

उंची : ८९ मीटर (महाराष्ट्रात सर्वोच्च)

लांबी : ९५९ मीटर

एकूण बांधकाम : ५,१८,००० घनमीटर

एकूण खोदकाम : ७०,५३० घनमीटर

Answered by steffiaspinno
31

बहुउद्देशीय धरण सिंचन, उद्योग आणि मानवी वापरासाठी पाणी साठवणे आणि पुरवठा करणे याला पूर नियंत्रण, वीजनिर्मिती, जलवाहतूक, जलवाहतूक संचय आणि पाणी सोडण्याचे नियमन यांसारख्या इतर वापरांसह एकत्रित करू शकते.

Explanation:

धरणांना बहुउद्देशीय प्रकल्प म्हटले जाते कारण धरणे नेहमीच सिंचनासाठी पाणी पुरवतात. आधुनिक धरणांचा उपयोग वीज निर्मिती आणि पाणीपुरवठा करण्यासाठीही केला जातो. धरणांना बहुउद्देशीय प्रकल्प म्हटले जाते कारण ते आपल्या जलस्रोतांचे व्यवस्थापन करण्याचे अनेक मार्ग देतात.

बहुउद्देशीय प्रकल्प हा एक मोठा प्रकल्प आहे जो पूर नियंत्रण, मत्स्य पैदास, सिंचन, वीज निर्मिती, मृदा संवर्धन इत्यादी विविध उद्देशांसाठी काम करतो, तर जलविद्युत प्रकल्प हे केवळ वीज पुरवण्याशी संबंधित आहेत.

Similar questions