२) भावे प्रयोगाची लक्षणे सविस्तर लिहा. BA/bcom
Answers
भावे वाक्यरचनेच्या या प्रयोगातील क्रियापद कर्त्याच्या अथवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नाही. ते नेहमी नपुंसकलिंगी, तृतीयपुरुषी, एकवचनी असते. उदाहरणार्थ,
(१) मी तुला उगीच मारले.
(२) आम्ही तुला बाजारात पाहिले.
(३) आपण लवकर यावे.
(४) सकाळी लवकर उठावे.
आपला आशय व्यक्त करण्यासाठी वाक्यांचे वेगवेगळे प्रयोग करीत असताना शब्दांच्या वाक्यातील क्रमाकडे लक्ष द्यावे लागते; नाहीतर अर्थात बदल होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, "न्यायाधिशांनी चोरी केल्याबद्दल चोराला शिक्षा दिली' या वाक्यात शब्दक्रम नीट न ठेवल्यामुळे चोरी न्यायाधिशांनी केली आणि शिक्षा चोराला दिली असा आशयभ्रम निर्माण होतो. बोलताना आपण सहेतुक विराम घेतो किंवा शब्दांवर आशयसूचक आघात देतो त्यामुळे शब्दांचा क्रम बदलला तरी, त्या क्रमाची योग्य कल्पना विरामातून व आघातातून सुचविली जाते परंतु; लेखनात ती सोय नसते म्हणून लेखन करताना शब्दक्रम योग्य राखण्याची तसेच. विरामचिन्हांचा योग्य ठिकाणी वापर करण्याची काळजी घ्यावी.