Art, asked by like19, 2 months ago

२) भावे प्रयोगाची लक्षणे सविस्तर लिहा.BA/ Bcom correct one​

Answers

Answered by likefreefire1
2

भावे प्रयोगाची लक्षणे कोणती ? अनमार्क डुप्लिकेट

मूळ उत्तर:

प्रयोगामध्ये प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. * कर्तरी, कर्मणी व भावे

त्यापैकी भावे प्रयोगाचे लक्षणे पुढील प्रमाणे :

1 } कर्ता तृतीयन्त किंवा चतुर्थयंत असतो.

उदा:- १) रामाने रावणास मारले. २) शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. ३) त्याने आता घरी जावे.

■2] कर्म असल्यास त्याची सप्रत्याची द्वितीया विभक्ती असते. उदा:- *रामाने रावणास मारले. * शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे.

3) अकर्मक भावे प्रयोगात क्रियापद विद्यर्थी असते.

उदा:- त्याने आता घरी जावे.

[4] शक्यार्थक क्रियापदांचा नेहमीच नेहमीच भावे प्रयोग होतो.

उदा: त्याला घरी जाववते.

भावे वाक्यरचनेच्या या प्रयोगातील क्रियापद कर्त्याच्या अथवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नाही. ते नेहमी नपुंसकलिंगी, तृतीयपुरुषी, एकवचनी असते. उदाहरणार्थ,

(१) मी तुला उगीच मारले.

(२) आम्ही तुला बाजारात पाहिले.

(३) आपण लवकर यावे.

(४) सकाळी लवकर उठावे.

आपला आशय व्यक्त करण्यासाठी वाक्यांचे वेगवेगळे प्रयोग करीत असताना शब्दांच्या वाक्यातील क्रमाकडे लक्ष द्यावे लागते; नाहीतर अर्थात बदल होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, 'न्यायाधिशांनी चोरी केल्याबद्दल चोराला शिक्षा दिली' या वाक्यात शब्दक्रम नीट न ठेवल्यामुळे चोरी न्यायाधिशांनी केली आणि शिक्षा चोराला दिली असा आशयभ्रम निर्माण होतो. बोलताना आपण सहेतुक विराम घेतो किंवा शब्दांवर आशयसूचक आघात देतो त्यामुळे शब्दांचा क्रम बदलला तरी त्या क्रमाची योग्य कल्पना विरामातून व आघातातून सुचविली जाते परंतु; लेखनात ती सोय नसते म्हणून लेखन करताना शब्दक्रम योग्य राखण्याची तसेच, विरामचिन्हांचा योग्य ठिकाणी वापर करण्याची काळजी घ्यावी.

Similar questions