भक्तीसंदर्भात संत नामदेवांनी कोणकोणते दृष्टान्त दिलेले आहेत?
Answers
Answer:::: संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण
स्पष्ट करा.
'अंकिला मी दास तुझा' या अभंगात संत नामदेवांनी आई बाळ, पक्षीण-तिची पिल्ले, वासरू - गाय, हरिणी-तिचे पाडस, चातक-मेघ अशा विविध उदाहरणांतून परमेश्वर कृपेची याचना व्यक्त केली आहे.
संत नामदेवांना विठ्ठल दर्शनाची, त्याच्या प्रेमप्रसादाची ओढ लागली आहे. परमेश्वराच्या प्राप्तीकरता त्यांचे मन व्याकुळ झाले आहे. या अभंगातून ते विठ्ठलभेटीची आपली तीव्र इच्छा व्यक्त करताना म्हणतात, ज्याप्रमाणे बाळ आगीच्या तावडीत सापडू नये, काही वाईट घडू नये, यासाठी बाळाच्या काळजीने आई धावत त्याच्यापाशी जाते, तसा भगवंता तू, माझ्यासाठी धावून येतोस. तुझ्या या प्रेमाने तू मला तुझा दास (सेवक) केले आहेस, मी तुला शरण आलो आहे.
पिल्ले जमिनीवर पडताच आकाशात विहार करणारी पक्षीण लगेच त्यांच्याजवळ झेप घेते, भुकेल्या वासराच्या ओढीने गायही दूध पाजण्यासाठी हंबरत त्याच्याजवळ धाव घेते. रानात वणवा लागल्याचे समजताच हरिणी आपल्या पाडसाच्या काळजीने व्याकुळ होते, तीही आपल्या पिल्लांच्या संरक्षणासाठी त्यांच्याजवळ धावत जाते.
पावसाच्या थेंबांची वाट पाहणारा चातक ज्या आतुरतेने ढगांना पाऊस पाडण्याची विनंती करतो, त्याच आतुरतेने हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाची वाट पाहत आहे. अशाप्रकारे, संत नामदेव विविध उदाहरणांद्वारे परमेश्वराजवळ त्याच्या भेटीची, दर्शनाची विनवणी करत आहेत.