भरणupenendedguestions)
(१) कवयित्रीला जशी अनेक रूपे घ्यावीशी वाटतात, तसे तुम्हांला कोण कोण व्हावेसे वाटते, ते लिहा.
उत्तर :please fast
Answers
Answer:
सई, तू मोठी झाल्यावर कोण होणार?" हा प्रश्न मला अगदी चार वर्षांची असल्यापासून विचारण्यात येतोय. हो अजूनही. त्याचं उत्तर मात्र नेहमी बदलतं. हो अजूनही!!
लहानपणी "मोठं होणं" ही एक लठ्ठ काळी कुळकुळीत रेष होती. एक दिवस ती ओलांडायची, मग त्यानंतर आयुष्य खूप सोपं होणार होतं. महत्त्वाचे निर्णय जसं की जेवणाच्या वेळेला उडदाच्या पापडाच्या लाट्या खाव्यात की नाही, किंवा साधारणपणे किती वेळ आजारी न पडता हौदात खेळता येतं वगैरे घेता येणार होते. मोठं झाल्यावर बाबाची अंथरुणातून मला खसकन ओढून बाथरूममध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी संपणार होती. तसंच मला पेल्यातलं दूध संपेपर्यंत न उडी मारता येणार्या उंच स्टुलावरही बसावं लागणार नव्हतं! आणि "चहा" या नावाखाली एक सहस्त्रांश चहा असलेलं भेसळयुक्त दूधही प्यावं लागणार नव्हतं!!
लहानपणी मला भांडी घासायची आणि धुणं धुवायची फार हौस होती. त्यामुळे पहिली काही वर्षं मला इस्त्रीचं दुकान काढायची इच्छा होती. कित्येक वेळेला आमच्या धुणंवाल्या सुमनमावशीकडे हट्ट करून मी दोन-तीन कपडे धुवायचे नळावर. ती बिचारी, "अगं तुझी आई आली तर मला रागवेल!", असं काकुळतीला येऊन म्हणायची. पण कपडे धुतल्याशिवाय मी गप्पच बसायचे नाही.
शाळेत जायला लागल्यावर खूप वर्षं मला शिक्षिका व्हायचं होतं. दुपारी घरी आले की मी नाडीवाली साडी नेसून, फळ्यावर माझ्या काल्पनिक वर्गाला शिकवायचे. कधी कधी बाबा माझा विद्यार्थी व्हायचा. मग त्याला आधी तो हुषार आहे की मठ्ठ हे सांगायचं, त्याप्रमाणे तो पुढे वागायचा. पण शिक्षिका होण्यासाठी सद्गुणी राहावं लागायचं. त्यामुळे लवकरच मला त्याचा कंटाळा यायचा.
एकदा शाळेत कुंभार आला होता. आम्हाला मातीची भांडी करून दाखवायला. तेव्हापासून मला कुंभार व्हायची फार इच्छा होती. तसे मी बागेत चिखलात प्रयोग सुद्धा केले. माझ्या संध्याकाळच्या ध्यानाकडे बघून आई नेहमी कपाळावर हात मारून घ्यायची. आईला निदान कमी राग यावा यासाठी विमल मावशी खराट्याच्या काडीनी माझी नखं साफ करायची. मी थेट निसर्गाकडे धाव घेऊ नये म्हणून मला आईबाबांनी चिकण माती आणून दिली. त्याला छान वास यायचा आणि खूप सारे रंगसुद्धा होते. पण त्यात काही मजा नाही. दोन दिवसांत मला त्याचा कंटाळा आला.
मग पुढे मला रामायणातली सीता व्हायचं होतं. ते करायला मी शिक्षिकेचीच साडी बिन पोलक्याची (अज्जीचा शब्द) घालायचे. वनवासातली सीता व्हायला. पण त्याचाही कंटाळा आला.
मग माधुरी दीक्षित आली. त्यानंतर खूप वर्षं मला ती व्हायचं होतं. नाच तर मी आधीपासून शिकायचे. तिच्यासारखा नाच करायचा आणि तिच्यासारखी नटी व्हायचं हे मी पक्कं ठरवलं होतं. पुढे नटी नाच बसवणारीचं ऐकते हे कळल्यावर मला सरोज खान व्हायचं होतं. एकदा मी माधुरीला प्रत्यक्ष भेटले. तेव्हा मी तिच्याकडे सरोज खानचा पत्ता मागितला!
लहानपणी मला राजीव गांधी फार म्हणजे फार आवडायचे . अगदी चार वर्षांची असल्यापासून. एकदा मी बाबाला माझ्यातर्फे "माझ्या राजीवला" पत्रं लिहायला सांगितलं. माझी भुणभूण थांबावी म्हणून त्यांनी लिहिलं देखील. मग एक दिवस आमच्या घरी पोस्टमन "पंतप्रधान" अशी मोहोर असलेलं पाकीट घेऊन आला! त्यात काय आहे हे बघण्याची त्याला इतकी उत्सुकता होती की बाबांनी ते उघडेपर्यंत तो तिथेच थांबला. मी तर बाबावर उड्या मारून सगळं घर डोक्यावर घेतलं!! आतमध्ये राजीव गांधींचा सहीवाला फोटो आणि एक खूप गोड पत्रं होतं!! माझ्यासाठी!! मला म्हणून आलेलं ते पहिलं पत्रं असेल!
राजीव गांधींची हत्या झाली तेव्हा मी सात वर्षांची होते. सकाळी सकाळी मला झोपेतून उठवून बाबानी बातमी दिली. तेव्हा मी बाबाला मिठी मारून रडले होते!
आता वाटतं खूप वेळा, राजीव गांधी सारखं पुन्हा कुणीतरी आवडावं! पण तेव्हा जसा मला "माझा राजीव" आवडायचा तसा आता कुणीच आवडत नाही. 
मग शाळा सुरू झाल्यावर सगळ्यांसारखी माझीही स्वप्नं तासली गेली. डॉक्टर, टीचर वगैरे वगैरे. पण मनात नेहमी काहीतरी जगावेगळं असतंच!! कधी मधेच मला स्वयंपाकी (मराठीत शेफ) व्हावसं वाटतं. आपलं हॉटेल असावं. फार मोठं नाही तसं, आटोपशीरच! तिथे लोकांनी गर्दी करावी. 
किंवा, खूप निवांत वेळ मिळावा आयुष्यात आणि सगळे बांध तोडून लिहायची मुभा मिळावी. किंवा एखाद्या कोपर्यात छोटंसं कॉफी-शॉप असावं माझं. आणि तलफेची वेळ संपली की मला लिहिता यावं. 
पुन्हा नाचता यावं, आणि हो, घराच्या मागल्या बाजूला एका कोपर्यात कुंभाराचं चाक असावं. 
Explanation:
कवयित्रीला जशी अनेक रूपे घ्यावीशी वाटतात, तसे तुम्हांला कोण कोण व्हावेसे वाटते, ते लिहा.
उत्तर :please fastAnd furious to make