India Languages, asked by soulkrishna1311, 1 year ago

bharat desh majha jagi mahan essay in marathi

Answers

Answered by dev3162
1

Answer:

i cant understand question tell it meaning in comments first mark as brainliast and follow me and thanks to my answer.

Answered by Ompatil420
3

Answer:

Explanation:

माझा भारत महान’ हे सुवचन सर्वत्र ऎकायला व पाहायला मिळते. नभोवानी, दूरचित्रवाणी अशा प्रसार्माध्यमांतून हे विधान आपल्या कानांवर , डोळ्यांवर आणि मनावर वारंवार ठ्सवले जाते. त्यामुळे भावनेच्या आहारी न जाता आपण वस्तुस्थितीचा विचार करू लागल्यास आपले मन जेव्हा शांतपणे विचार करू लागतो तेव्हा मनात्येते की , खरोखरच माझा भारत जगात महान आहे का ?

नुकत्याच झालेल्या आलिम्पिक स्पर्धांत एवढ्या विशाल भारतातील खेळाडूंची काम्गिरी काय ? तर एक कांस्य पदक ! भारतातील एखाद्या राज्याएवढ्या छोत्या देशांनीही अनेक सुवर्णपदके पट्कावली ; मग भारताला असा पराक्रम का जमू नये ? १९४७ साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला , तेव्हाच जपानही अणुबॅम्बहल्ल्यातून स्वत:ला सावरत होता. पण आज औद्योगिक प्रगती आणि व्यापार या दोन्ही बाबतींत जपान जगाला अग्रेसर आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात मात्र लोक्संख्या प्रचंड प्रमाणात वाढली, निरक्षरतेचे प्रमाण वाढले. नॆतिकतेचा विलक्षण र्हास झाला. मग असा हा भारत जगी महान आहे , असे कसे म्हणता येईल?

एक काळ असा होता की भारत ही सुवर्णभूमी होती. ज्ञान व अध्यात्म या क्षेत्रात अग्रेसर होता. अनेक परदेशी विद्वान येथे ज्ञान्ग्रहणासाठी येत आणि येथील पंडीत त्यांना ज्ञानदानाचे कार्य करत. ही महान परंपरा भारताला लाभली आहे. भारताचा इतिहासही उज्ज्वल आहे. निसर्गाची विविधता आणि महानता भारतात आहे. आपल्या उज्ज्वल संस्क्रूतीचा वारसा लाभला आहे; पण तरीही जीवनाच्या विविध क्षेत्रांत आजही आपला हा भारत इतर राष्टांच्या मानाने खूपच अप्रगत आहे. भारतात आज्मितीला अफ़ाट दारिद्र्य परिश्रमावाचून संपत्ती मिळ्वण्याकडे भारतीयांचा कल वाढ्त आहे. शिस्त, परिश्रम, स्वावलंबन यांच्या बळावर व त्याहीपेक्षा देशहितांची खरी कळ्कळ बाळ्गून जर भारतीय काम करू लागले, तर हा आपला भारत खरोखरच महान राष्ट्र होईल व मग ’मेरा भारत महान ’ असे आपन मोठ्या अभिमानाने म्हणू शकू

Similar questions