bharat ek mahasatta essay in marathi
Answers
Answer:
अमेरिका आणि युरोपवर सध्या आथिर्क अरिष्ट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील नागरिक, कॉपोर्रेट सेक्टर आणि सरकारांना भारत आणि चीन यांच्याकडून खूप आशा आहेत. कारण भारत केवळ एक मोठा देशच नसून येथे जगातील सवोर्त्तम कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध आहे.
येथील डॉक्टर, इंजिनीअर, प्राध्यापक आणि मॅनेजर्स केवळ भारतातच नव्हे तर मंदीच्या तडाख्यात सापडलेल्या जागतिक बाजारपेठेतही अग्रस्थानी टिकून आहेत. त्यामुळेच असे म्हटले जात आहे की, भारताची स्वत:ची अशी 'विकास कथा' आहे. परंतु येथे अनेक समस्याही आहेत. ज्यांचे लवकर निराकरण झाले तर भारत नि:संशय जागतिक महासत्ता होऊ शकेल.
आय वॉच अनुसार :
-७१ टक्के किंवा ७७ कोटी भारतीय नागरिक पस्तिशीच्या आतील आहेत. चीन-जपान यांच्या तुलनेत भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे.
-दरवषीर् अडीच कोटी मुलांचा भारतात जन्म होतो. त्यातील ७० लाख मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे देशाची लोकसंख्या दरवषीर् १.६ टक्क्यांनी वाढते.
-९० ते ९४ टक्के मुले केजी किंवा बारावी पर्यंत शिक्षण सोडून देतात. शाळेचे तोंडदेखील न पाहिलेल्या मुलांचाही यात समावेश आहे.
केवळ १० टक्के तरुणच बारावीनंतरचे शिक्षण सुरू ठेवू शकतात. केवळ पदवी मिळवण्यासाठी आपले तरुण शिक्षण घेतात. सामान्यत: या पदव्यांचा त्यांना रोजगार मिळवण्यासाठी फारसा उपयोग होत नाही तसंच देशाच्या जीडीपीतही ते फारसे योगदान देऊ शकत नाहीत.
-पदवीधरांमध्ये २२ हजार कॉलेजांतील ६२ टक्के विद्याथीर् कला शाखेचे पदवीधर आहेत. उर्वरित ३८ टक्के विद्याथीर् सायन्स, कॉमर्स, मेडिकल, इंजिनीअरिंग, आयटी, कायदा, मॅनेजमंेट आणि विशेष विषयांचे पदवीधर आहेत. कला शाखेची टक्केवारी कमी होणे गरजेेचे आहे.
-आमदार-खासदार, नगरसेवक आणि ग्रामपंचायतीचे सदस्य यांची निवड केवळ पाच वर्षांसाठीच असते. मात्र, सरकारी कर्मचारी-अधिकारी, काम असो वा नसो, प्रदीर्घ काळापर्यंत सेवेत असतात.
-भारतात साक्षरतेची व्याख्या खूपच मर्यादित आहे. जसे की, तुम्हाला तुमचे नाव लिहिता आले तर तुम्ही साक्षर समजले जाता. हे चुकीचे आहे.
-देशाच्या एकंदर लोकसंख्येच्या केवळ अडीच टक्के लोकच संघटित क्षेत्रात कार्यरत आहेत. उर्वरित सर्वजण असंघटित क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना कामाच्या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधाही उपलब्ध होत नाहीत.
-सरकारने दारिद्यरेेषेखालील लोकांची जी व्याख्या केली आहे त्यानुसार सध्या २६ कोटी नागरिक या प्रकारात मोडतात. दारिद्यरेषेखालील लोकांची ही संख्या कमी करण्याचे प्रामाणिक प्रयत्न झाल्यास देशाच्या उत्पादकतेत वाढ होऊ शकते. ज्यामुळे केवळ जीडीपीच वाढणार नाही तर समाजाचे जीवनमानही उंचावू शकते. (क्रमश:)
Explanation:
please mark me as Brainlist.