Bharat Maza Desh aahe essay in Marathi
Answers
Answer:
Bharat maze Desh aahe saare Bhartiya maze bandhav aahe
Answer:
Wednesday, 18 January 2012
'भारत माझा देश आहे'
'भारत माझा देश आहे', असे आपण नेहमी म्हणत असतो, परंतु या भारत देशाची आणि या देशाच्या इतिहासाची जाणीव कोणाला आहे का?
या देशाचा इतिहास हा संघर्षवादी असा इतिहास आहे, अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन तसेच महापुरुषांनी आपल हित न पाहता या देशातील जुन्या रूढी, परंपरा, जाती-भेद असे अनेक आजार जे ब्राह्मण्यवाद्यांनी पसरविले, ते महाभयंकर आजार मुळापासून नष्ट करण्यासाठी या महापुरुषांनी संघर्ष केला. मनुष्याला माणुसकीची जाणीव करून दिली, शिक्षणाचा प्रसार केला. परंतु आज कोणालाही या महान वीरांच्या संघर्षाची जाणीव राहिलेली नाही.
शालेय शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत इतिहास हा विषय शिकविला जातो, परंतु काय या इतिहासाची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली जाते का? नाही असे माझे मत आहे, कारण इतिहासाची जाणीव विद्यार्थ्यांना झाली असती, तर इतिहास हा विषय विद्यार्थ्यांना ........बोर......... वाटला नसता. आज प्रत्येक विद्यार्थी हा इतिहास विषय शिकताना झोपा काढत असतो, त्याला इतिहासाची जाणीवच करून दिली जात नाही तर त्याला आपला 'भारत देश' आणि या देशाचा इतिहास समजणार कसा.
आज भारत देशाचे लोक डॉक्टर झाले, अभिनेता-अभिनेत्री झाले, मंत्री झाले, शिक्षक-शिक्षिका झाले, कोणामुळे असे त्यांना विचारले असता ते मोठ्या मानाने म्हणतात. माझ्या आई- वडिलांमुळे, देवांमुळे किंवा माझ्या मेहनतीमुळे परंतु त्यांना हेच माहित नाही कि छत्रपती शिवाजी महाराज-महान शिक्षक साने गुरुजी-फुले-शाहू-आंबेडकर तसेच माता जिजाऊ, 'माता सावित्रीबाई फुले', माता रमाबाई, आदी महान लोकांनी शिक्षणासाठी आपल्या न्याय-हक्कासाठी संघर्ष केला नसता तर आपण शिकू शकलो असतो काय, उंच मानाने या जगात जगू शकलो असतो काय, या देशात शिक्षणाचा प्रसार झाला असता का? या सर्व गोष्टींचा कोणी विचार देखील नाही करत, तर या देशाचा विकास कसा होईल.
माझ्या मते इतिहासातूनच उद्याचे भविष्य घडते हे विसरून चालणार नाही, आपल्या भारत देशाचे भविष्य उज्वल करायचे असल्यास, आपल्याला इतिहासाचा अभ्यास करणे अतिआवश्यक आहे,
आज या महान वीरांच्या नावाने अनेक राजकारणी आपल पक्ष चालवतात, जेव्हा काही संकट आल तेव्हा याच महान वीरांच्या संघर्षाची दोन-तीन उदाहरणे दिली कि आपल काम झाल असं हे राजकारणी समझतात. परंतु महापुरुषान सारखे रस्त्यावर उतरून अन्याया विरुद्ध संघर्ष करणे म्हणजे यांच्या कपाळावर आठ्या पसरतात. सुरुवातीला जो पर्यंत सत्तेवर येत नाही तोपर्यंत काही चांगली कामे करावी नंतर तू कोण-कुठला असे यांचे ठरलेलं असत. आधी या देशावर गोऱ्या इंग्रजांचं राज्य होतं आता काळ्या इंग्रजांचं राज्य आहे.
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद या सारख्या अनेक महान क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन गोऱ्या इंग्रजांपासून आपली सुटका केली, आता काळ्या इंग्रजांपासून आपली सुटका कोण करणार?
या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडेच आहे.............!
विचार करा-वाईट विचारात बदल करा-देवांवर अवलंबून राहू नका-आणि एक नवीन अंधश्रद्धेच्या दिशेने नाही तर विज्ञानाच्या दिशेने धावणारा भारत उभा करा....................जय भीम......जय भारत.......!