History, asked by uddhavithape90, 1 month ago

२) भटक्या अवस्थेतील समाजजीवन व स्थिर समाजजीवन याबद्दल तुलनात्मक चिकित्सा करा.​

Answers

Answered by mohit242009
2

Answer:

उदरनिर्वाहाकरिता निवडलेल्या अगर वाट्यास आलेल्या व्यवसायानिमित्त अगर उदरनिर्वाहाच्या साधनांच्या शोधार्थ भटकत राहणाऱ्या लोकांना भटके म्हणतात. इंग्रजीत त्यांचा उल्लेख 'नोमॅड्स' असा करतात. नोमॅड हा शब्द 'नोमी' किंवा 'नेमो' (गुरे चारणे) या ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. स्वतःचे कायम स्वरुपाचे घर किंवा शेतजमीन नाही; परंतु गुरांचे कळप आहेत, असे लोक गुरांसाठी चराऊ कुरणांच्या शोधार्थ सतत भटकत असतात, अशा लोकांना उद्देशून नोमॅड हा शब्द वापरला जातो. हा शब्द किंवा संकल्पना फक्त जंगलात भटकणाऱ्या लोकांसाठीच वापरली जात नाही, तर एकाच ठिकाणी कायमचे वास्तव्य न करता सतत भटकंती करणाऱ्या लोकांसाठीही ती वापरली जाते. खेचरे, गाढवे, तटटू, घोडे, उंट इत्यादींवर आपली मालमत्ता लादून स्वतःच्या इच्छेनुसार किंवा परिस्थितीच्या दडपणामुळे चांगली उपजीविका होऊ शकेल, अशा ठिकाणांच्या शोधात असे लोक सतत स्थलांतर करीत रहातात, डोंबारऱ्याचे खेळ, जादुचे खेळ, भविष्य कथन, किरकोळ व्यापार, कारागिरी, वैद्यकी इ. व्यवसाय ते करतात. सतत भटकणाऱ्या समूहांव्यतिरिक्त काही समूह हे अर्ध-भटके जीवन जगतात. अशा समूहांजवळ स्वतःचे घर किंवा थोडीफार शेतजमीन असते आणि शेतीचा हंगाम संपल्यानंतर जेथे उदरनिर्वाहाकरिता लागवडीला योग्य अशी जमीन उपलब्ध असेल, तेथे कुटुंबियांसह आणि सामानासह ते स्थलांतर करतात, हंगाम संपल्यानंतर ते आपल्या मूळ ठिकाणी येतात.

Answered by sgokul8bkvafs
2

Answer:

Explanation:भटके (नोमॅड )

अमेरिका आणि युरोप खंडात असे भटके जीवन जगणाऱ्या जमातींना जिप्सी म्हणतात. जिप्सी हा शब्द ईजिप्शियन ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे. जिप्सी हे मूलतः भारतातून आले असावेत, असेही तज्ञांचे मत आहे. भारतातून दोन हजार वर्षांपूर्वी त्यांनी युरोप-अमेरिकेकडील देशांत स्थंलांतर केले, असे म्हटले जाते. जुलमी आक्रमणाला शरण न जाता आपले अस्तित्व टिकविण्यासाठी आणि स्वाभिमानाला उणेपणा येउ नये, यांसाठी जिप्सींना स्थलांतर करावे लागले.

भटक्यांच्या निरनिराळ्या विकसित अवस्थांचा विचार केला,तर असे आढळून येते की 'अन्नशोधक भटके' ही मानवाची प्राथमिक अवस्था होती. नैसर्गिक साधनसंपत्तीवर (कंदमुळे, फळे आणि मासे) ते आपला निर्वाह करीत असत, पाषाण युगात मानवाला दगडी हत्यारे तयार करता येऊ लागली, त्यांचा उपयोग ते स्वरक्षणासाठी आणि प्रतिहल्ल्यासाठी करु लागले, धातूच्या आणि लाकडाच्या लवचिकपणाचा शोध लागल्यानंतर धनुष्यबाण, परशुसारखी काही हत्यारे त्यांना करता येउ लागली. या हत्यारांच्या साहाय्याने त्यांना शिकार करता येणे शक्य झाले. शिकार केलेल्या प्राण्यांच्या मांसाचा त्यांनी आपल्या अन्नात समावेश केला. 'शिकारी भटके' ही त्यांची 'अन्नशोधक भटक्या' नंतरची अवस्था होय.

Similar questions