bhraman dhwani nastya tar ...
essay in marathi
Answers
Explanation:
नमस्कार मित्रा,
भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल.
★ भ्रमणध्वनी नसते तर -
माझा भ्रमणध्वनी आज दिवसभर बंद होता. मी त्यामुळे खूप अस्वस्थ झालो. दिवसभर कशात मन लागेना. कुणाशी संपर्क साधण्यासाठी कॉल करता येईना. आज एका दिवसात माझी इतकी फजिती झाली तर भ्रमणध्वनी अस्तित्वातच नसते तर काय झाले असते.
भ्रमणध्वनी चा शोधच लागला नसता तर, अजूनही आपल्याला कुणाशी संपर्क साधण्यासाठी त्यांच्याकडे जावे लागले असते किंवा कमीत कमी पत्र पाठवावे लागले असते. मग त्या पत्राचे उत्तर मिळायची वाट पाहावी लागली असती. एक संदेश पाठवायचा असेल तरी किती दूर प्रवास करावा लागला असता.
भ्रमणध्वनी नसते तर आपले जीवन किती मुश्किल झाले असते याची मी कल्पनाही करू शकत नाही. आज मोबाईल वर बस/रेल्वे/विमान तिकीट बुक करता येतात, टीव्ही चा रिचार्ज करता येतो, एका क्षणात कुणाला पैसे पाठवता येतात. यापैकी काहीही करता आले नसते.
परंतु एका दृष्टीने भ्रमणध्वनीचा अभाव वरदान ठरला असता. लोकांचा प्रात्यक्षिक संबंध वाढला असता. आताच्या व्हाट्सएपच्या जगात कुणि कुणाला शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर निघत नाही. मानसिक भावनांचा अभाव दिसायला लागलाय. यापेक्षा भ्रमणध्वनी नसतेच तर किती बरे असते ना.
भ्रमणध्वनी वरदान असो की शाप, ते नसते तर आपले आयुष्य अवघड झाले असते हे नक्की.
धन्यवाद...
Please mark me as a brainlist please