Bhrashtachar ek samasya essay in marathi
Answers
आमच्या देशातील भ्रष्टाचाराची एक सामान्य पद्धत ऑनलाइन पैसे हस्तांतरित करून किंवा महागडीच्या स्वरूपात रोख रक्कम प्राप्त करीत आहे. काही लोक त्यांच्या स्वत: च्या फायद्यासाठी इतर कुणाही व्यक्तीचा चुकीचा वापर करतात सरकारी किंवा गैरसरकारी कार्यालयांमध्ये भरती झालेल्या काही लोक भ्रष्टाचारात गुंतले आहेत आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीही करू शकतात.
भ्रष्टाचार हि समाजाला लागलेली किट आणि कलंक आहे. भ्रष्टाचार रुपी किट हे आजारासारखे समाजाला आतून पंगू बनवते. कित्येक लायक आणि योग्य व्यक्ती भ्रष्टाचारापायी लाचार आणि बेकार झाले आहेत. हा भ्रष्टाचार फक्त समाजाच्याच नव्हे तर देशाच्या अस्मितेला सुद्धा राहू सारखा ग्रासत आहे. आज भ्रष्टाचाराचा बाबतीत भारताचा जागतिक पातळीवर ७८ वा क्रमांक लागतो. ह्यावर उपाययोजना म्हणून कित्येक कायदे अमलात आणले गेले परंतु समस्या जैसे थे तशीच आहे. ह्या भ्रष्टाचारापायी गरीब आणखी गरीब आणि श्रीमंत आणखी श्रीमंत होत आहे. सभ्य आणि सुसंस्कृत समाजाच्या विकासातील भ्रष्टाचार हि पायबेळी आहे.
जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती हा भ्रष्टाचारासाठी स्वतःला जिम्मेवार मानत नाही, तोपर्यंत भ्रष्टाचार मिटण्याची शक्यता कमीच. मी लाच देणार नाही, आणि लाच घेणार हि नाही, हे ब्रीदवाक्य समाजातील प्रत्येक व्यक्ती जोपर्यंत जिरवून घेत नाही, तो पर्यंत तरणोपाय नाही.