Bhukamp nishkarsh information in marathi
Answers
Answer:
भूकंप - भूगर्भातील हालचालींमूळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती "भूकंप लहरी" तयार होण्यात होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा गोष्टी घडतात. भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो. साहजिकच त्याााा
llllll
भूगर्भात निर्माण होणारे धक्के व लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशांनी पसरतात. जमिनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगमस्थानास भूकंपनाभी म्हणतात भूकंपनाभीच्या अगदी वर, भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. तीव्र स्वरूपाच्या लाटा किंवा हादरे सर्वप्रथम या केंद्रालगत येऊन पोहोचतात, त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वात जास्त असते. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपांपेक्षा सौम्य भूकंपांची संख्या खूपच जास्त असते. भूकंपालेख यंत्रांवर धक्क्यांची नोंद आपोआप होत राहते. १२ जानेवारी २०१० रोजी दुपारी ४:१३ वाजता२ झालेला हैतीचा भूकंप हा कॅरिबियनमधील हैती ह्या देशात झालेला एक विनाशक भूकंप होता. रिश्टर स्केलवर ७.० एवढ्या क्षमतेने मोजल्या गेलेल्या ह्या भूकंपाचे केंद्र राजधानी पोर्ट-औ-प्रिन्सच्या २५ किमी पश्चिमेला होते.
[चित्र] भूकंपामध्ये ढासळलेले राष्ट्रपती भवन [चित्र] भूकंपाचे केंद्र हैतीच्या ह्या भूकंपाने हैतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी झाली. सुमारे २ ते ३ लाख लोक मृत्यूमुखी पडल्याची भिती व्यक्त करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघाने ह्या भूकंपाचे आजवरील सर्वात भयानक नैसर्गिक आपत्ती असे वर्णन केले आहे. जगभरातील अनेक देशांनी हैतीला मदत करण्यात पुढाकार घेतला होता. हैती सरकारच्या अंदाजानुसार या भूकंपात २,५०,००० घरे आणि ३०,००० इतर इमारती नष्ट झाल्या.
नैसर्गिकरीत्या भूकंप होण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. पृथ्वीवर ज्या ठिकाणी मुळातच भूकवचावर भेगा आहेत, आणि अशा भेगांखालचे खडकांचे थर किंवा शिलाखंडांच्या चकत्या जेव्हा एकमेकांवर घसरतात तेव्हा होणाऱ्या अकस्मात हालचाली हे भूकंपाचे पहिले कारण आहे. कॅलिफोर्नियातील सॅनफ्रान्सिको येथील १९०६ मधील भूकंप, १८९७ चा आसामचा भूकंप, १९३४ चा बिहारचा भूकंप व १९३५ मधील क्वेट्टाचा भूकंप हे या प्रकारचे भूकंप होते.
दुसरे कारण : ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेदेखील भूकंप घडतात. १८६८ मध्ये हवाई बेटांमधल्या ’मौना लोआ’ ज्वालामुखीचा उद्रेक होण्यापूर्वी तेथे सतत सहा दिवस वाढत्या तीव्रतेचे भूकंप होते. सामान्यत: ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे घडणारे भूकंप हे मर्यादित क्षेत्र व्यापणारे व कमी विध्वंसक असतात.
चिनमधील झॅंग हेंग ने बनविलेल्या, भूकंपाची नोंद घेणाऱ्या, जगातील प्रथम यंत्राची प्रतिकृती : यास 'होउफेंग डिडोंग यी' असे नाव होते.
भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास "सेस्मोग्राफ" अथवा "सेस्मॉमीटर" असे नाव आहे. तसेच भूकंपाची ’महत्ता’ मोजण्यासाठी "रिश्टर स्केल" ह्या एककाचा वापर केला जातो. हे एक गणिती लॉगरिथमिक एकक आहे. पाच स्केलच्या भूकंपातून निर्माण होणारी ऊर्जा, चार रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या दहापट असते. भूकंपाची ’तीव्रता’ मापण्याचे एक वेगळे Modified Mercalli Intensity Scale नावाचे अ-गणिती स्केल आहे. त्याचा संबंध भूकंपाने होणाऱ्या नुकसानाशी निगडित असतो, ऊर्जेशी नसतो.
३ रिश्टर स्केल वा त्यापेक्षा कमी महत्तेचे भूकंप जास्त धोकादायक नसतात. महत्ता ७ किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास प्रचंड प्रमाणात हानी होऊ शकते. भूकंपाचे उगमस्थान जमिनीच्या खाली जितके जवळ, तितके नुकसानीचे प्रमाणही जास्त. भूकंपाचा केंद्रबिंदू वाळवंटात असेल तर नुकसान होण्याची शक्यता अगदी कमी.
समुद्राच्या तळाशी झालेला मोठा भूकंप प्रलयंकारी लाटा (त्सुनामी) निर्माण करू शकतो.
भूकंपाचे मुख्य कारण जरी भूगर्भ-चकत्यांमधील घर्षण हे असले तरी खालीलपैकी कोणत्याही कारणाने भूगर्भात हालचाल होऊ शकते आणि भूकंपसदृश धक्के बसू शकतात.
ज्वालामुखी जागृत झाल्याने.
खाणींमध्ये किंवा अन्यत्र केलेले कृत्रिम स्फोट.
अणुचाचण्या
भूकंपमापनाचे 'रिश्टर' नावाचे परिमाण संपादन करा
रिश्टर स्केलमध्ये मोजलेल्या वेगवेगळ्या तीव्रतेच्या भूकंपांच्या परिणामांचे वर्णन खाली दिले आहे. भूकंपामुळे होणारे दुष्परिणाम फक्त भूकंपाच्या महत्तेवरच अवलंबून नसून त्या गावाचे भूकंपाच्या केंद्रबिंदूपासूनचे अंतर, भूकंपाच्या नाभीची भूकंपकेंद्रापासूनची जमिनीखालील खोली व गावाची आणि त्याच्या आसपासची भौगोलिक परिस्थिती यांवरही अवलंबून असतात. (काही प्रदेश भूकंपाच्या संकेतांची (सिग्नल्सची) तीव्रता वाढवतात.)[१]
Explanation:
hope this help you
plz mark me as brainlist and also follow me