India Languages, asked by vedikabelokar8, 1 month ago

biography of soldier in marathi​

Answers

Answered by vvvpppsssaaa
1

Answer:

जन्म आणि बालपण

माझा जन्म कांगडाच्या डोंगराळ भागात झाला. आमच्या क्षेत्रात, शेतीसाठी योग्य अशी जमीन फारच कमी आहे, म्हणून बरेच लोक सैन्यात भरती होतात. म्हणूनच आम्हाला लहानपणापासूनच विशेष प्रशिक्षण दिले जात असत. माझे वडील देखील एक सैनिक होते आणि अनेक वर्षे सैन्यात राहिले असताना त्यांनी भारतमातेची सेवा केली. मलाही त्याच्यासारखे सैनिक होण्याची तीव्र इच्छा होती. तारुण्यात मी घोडेस्वारी, पोहणे, डोंगर चढणे इत्यादी शिकलो.

सैनिकी प्रशिक्षण

शेवटी, एके दिवशी मी देहरादूनमधील सैनिक शाळेत प्रवेश घेतला. काही दिवसातच मला खूप चांगले लष्करी शिक्षण मिळाले. मी रायफल्स, मशीन गन, तोफ इत्यादींचे संचालन करण्याचे पूर्ण प्रशिक्षण घेतले. मोटर-ट्रक ड्रायव्हिंगचीही मला अनेक प्रमाणपत्रे मिळाली. रणांगणात गोळीबार, कार्यवाही आणि संचालनाचा मला बराच अनुभव मिळाला.

Answered by siddhi710
29

☆▪︎▪︎▪︎● एका सैनिकाचे मनोगत ●▪︎▪︎▪︎☆

विजय दादा आठ दिवसांच्या रजेवर गावात आला होता. तेव्हा गावातील मुले त्याच्याभोवती गोळा झाली. त्यातील एका मुलाने विचारले, "विजय दादा , कसं वाटते रे तुला सैन्यात गेल्याबद्दल?" विजय दादा हसून म्हणाला, "अरे बाबांनो, सैन्यात जाणे माझे ध्येयच होते. थांबा, मी तुम्हांला माझी कहाणीच सांगतो.

तीन वर्षांचा असतानाच माझ्या बाबांना शत्रूबरोबर लढताना मरण आले. आजोबांनी व आईने मला मोठे केले. सैन्यात दाखल व्हायचे असे मी ठरवले. पाचव्या इयत्तेपासूनच मी सातारच्या सैनिकी शाळेत दाखल झालो. मी वसतिगृहात राहायचो. मग मी सैनिकी महाविदयालयात नाव घातले. तेथे पदवी मिळवतानाच मला सैन्यात गोकरी मिळाली. पहिले दीड वर्ष वेगवेगळे तांत्रिक शिक्षण घेण्यात गेले. ते पूर्ण झाल्यावर 'मेजर' म्हणून भारताच्या उत्तर सीमेवर माझी नेमणूक झाली.

आमचे काम खूप अवघड आहे. आम्ही जेथे असतो तो भाग अतिशय थंड आहे. शिवाय आम्हांला डोळ्यांत तेल घालून सीमेची राखण करावी लागते. शत्रूकडून मारा सुरू झाला, तर आम्हांला आपले ठाणे सोडता येत नाही. शत्रूच्या हल्ल्यात आपले सहकारी मृत्यू पावले, तर फार दुःख होते. माझ्या सैनिकी जीवनात मला अजून प्रत्यक्ष लढण्याची संधी मिळाली नाही. पण माझ्या देशाच्या रक्षणासाठी मी सदैव तयार असतो. ते मी माझे परमभाग्य समजतो."

Hope it helps you✌❤

Similar questions