Birds and animals life short speech in Marathi
Answers
Answer:
I don't know ans of the question
"हिरवे हिरवे गार गालिचे.." ही कविता तुम्ही तुमच्या लहानपणी ऐकली असेलच. हो बरोबर ह्या कवितेतील ओळी आपल्याला निसर्गाबद्दल बरच काही सांगून जातात. ह्या जगात निसर्गाला खूप मोठे स्थान दिले आहे. आपण जी श्वास घेतो ती हवा, पीतो ते पाणी आणि खातो ते अन्न सगळ निसर्गाची देण आहे. निसर्गाचे संरक्षण करणे, त्याला हानी न पोहचवणे हे सगळं आपल्या हातात आहे कारण आपल्या रोजच्या कामांमध्ये निसर्गाचा मोठा संबंध आहे. उंच उंच डोंगर, वाहणाऱ्या नद्या, मोठे झाड, कीलबिलणारे पक्षी, सुंदर प्राणी ह्या सगळ्या गोष्टींवर सुद्धा निसर्गाचा प्रभाव असतो.
तसेच लहानपणी " किलबिल किलबिल पक्षी बोलती, सांग सांग भोलानाथ, शेपटी वाल्या प्राण्यांची" ह्या कविता आपल्याला लहानपणी पासून सांगत आल्या आहेत आणि ह्या कविता प्राण्यांचे महत्त्व सांगतात. प्राणी पक्षी आपल्या पर्यावरणात खूप महत्त्वाचा भाग आहेत.
हा मुका जीव आपल्याला बरेच काही शिकवतो. माझा आवडता प्राणी तसे सगळेच आहेत पण कुत्रा मला खूप आवडतो. कुत्रा हा माणसाचे ऐकतो, आणि खूप प्रेमळ असतो. माणसाच्या कठीण प्रसंगी कुत्रा, मानसिक शांती देतो.
म्हणुनच सगळे प्राणी पक्षी आपल्या खऱ्या मित्रांसारखे असतात.