India Languages, asked by akashchaudhari648, 3 months ago

चिंचेच्या झाडावर रक्ताळलेले मुंडके कोणाला दिसले?​

Answers

Answered by brainly1234567891011
2

चिंच अजीर्ण, मळमळ, पित्ताची जळजळ कमी करते. आपल्याकडे सणवाराला पुरणपोळीसोबत चिंचेचे पन्हे घेण्याची जुनी पध्दत आहे.

वैद्य राहुल सावंत (आयुर्वेदाचार्य)

बघताच क्षणी तोंडात लाळ सुटविणारे फळ म्हणजे चिंच. अबालवृध्दांमध्ये विशेषतः लहान मुलं व स्त्रियांमध्ये खास लोकप्रिय असलेली चिंच जिभेवर ठेवताच एक वेगळाच फिल येतो. तोंडाला पाणी सुटण्यासह रुचिप्रदान करणे ही आंबट चिंचेची खासियत आहे. पाणीपुरी, इमली चटणी, चाट या प्रकारात चवीच्या दृष्टीने चिंच हृदयस्थानी असते.

लांबट आकाराच्या चिंचेचे कच्चे फळ हिरवे तर पिकलेली चिंच लाल-तांबूस रंगाची असते. कच्ची चिंच अत्यंत आंबट चवीची, स्त्राव वाढवणारी, पित्त प्रकोषक, मुख, जिव्हा, हिरड्या स्वच्छ करणारी, उग्रवास-मुखदुर्गंधीचा नाश करणारी असते. त्याऊलट पिकलेली चिंच चवीला कमी आंबट असते. ही चिंच अजीर्ण, मळमळ, पित्ताची जळजळ कमी करते. आपल्याकडे सणवाराला पुरणपोळीसोबत चिंचेचे पन्हे घेण्याची जुनी पध्दत आहे.

आंबट चिंच अधिक प्रमाणात सेवन केल्यास तोंड, घशात चिरा पडते, घसा लाल होतो, दात आंबतात, दातावरचे आवरण ढिसूळ बनते. त्यामुळे तिचा अतिवापर टाळावा.

उपयोग - चिंचेची कच्ची व पिकलेली चिंच, चिंचोका बी, झाडाची पाने, चिंचेचा कोळ असे विविध उपयोगी अंग आहेत.

शिजविण्यास जड असलेल्या मांसाहारी पदार्थात कच्ची चिंच ठेचून टाकावी म्हणजे मांस सुपाच्य होते.

आले, सैंधवासोबत चिंच चघळल्यास पित्ताची जळजळ कमी होते.

जीर्ण मलबध्दता असल्यास इतर उपचार उपयोगी पडत नाही अशावेळी चिंचालवणतेले हुकुमी चिकित्सा ठरते असा अनुभव आहे.

उन्हाळ्यात विशेषतः मे महिन्यात उन्हाळी लागणे. लघवीची आग, पोट फुगणे, घाम येऊन थकवा, जीव घाबरणे असे त्रास उदभवतात. अशावेळी चिंचेचा कोळ दोन चमचे अधिक मधासोबत खजीसाखर घ्यावा.

संधान प्रक्रिया (आंबविणे) साठी सालीचे तुकडे उपयोगी असतात.

अवयवांना आलेले शैथील्य, ढिलेपणा कमी करण्यासाठी चिंचोका उगाळून त्याचा लेप नियमितपणे केल्यावर पेशीसंकोच होऊन मुळ आकार प्राप्त होतो.

हिरवट पांढऱ्या रंगाची सुडौल चिंचेतील आतील साल खडीसाखरेसोबत नियमित सेवन केल्याने नवप्रसुतास दूध भरपूर प्रमाणात वाढते.

मैथुनशक्ती वाढविण्याची अपेक्षा असणाऱ्याने चिंचोका चुर्ण गुळ ओवा यासोबत रात्री खावी अथवा गव्हाचे कणिकेत चिंचोका पीठ मिश्रण करुन दुधात भिजवून केलेल्या भाकरी उडीदासोबत नियमित सेवन करावे.

विविध प्रातानुसार चिंच, आमसूल दही अशा आंबट द्रव्यांचा उपयोग केला जातो. दक्षिण प्रांतात चिंचेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

चिंचेचे सरबत - साधारणतः दोन लीटर पाण्यामध्ये एक किलो निवडलेली चिंच रात्रभर भिजत घालावी. हे मिश्रण सकाळी हाताने एकजीव करुन चिंचेचा कोळ काढावा. त्यानंतर हे सगळे मिश्रण मंद आचेवर उकळवत किमान चार किलो साखर घालून पक्का पाक तयार करावा. हे मिश्रण काचेच्या बरणीत साठवावे. या पध्दतीने बनविलेले चिंचेचे सरबत दुपारी तीने-चार चमचे या प्रमाणात पाण्यात टाकून पिण्याने उष्णता कमी होते. तसेच मलमुत्र प्रवृत्ती साफ होण्यास मदत मिळते. तसेच उत्तम रितीने भूक वाढून ताजेपणाचा अनुभव मिळतो.

सेवन निषेध

पुर्वीच्या काळात चिंचेच्या झाडाखाली नियमित बसू नये अथवा रात्री झाडाखाली झोपू नये असा दंडक आहे. कदाचित यामुळे पित्त प्रकोप, अस्वस्थता वाढत असावी.

नैसर्गिक पध्दतीने पित्ताचा प्रकोप करणारा शरद ऋतु(ऑक्टोबर हिट)मध्ये चिंचेचे सरबत घेऊ नये.

पोटात आग होत असेल, घसा, टॉन्सिल यांना सूज सेत असेल, आतड्यांना येणारी सूज, अल्सर यावेळी चिंचेचे सरबत पूर्णपणे वर्ज्य समजावे.

दमट हवामान, अत्याधिक ऊन, उष्णता या वातावरणात चिंच खाण्यापासून अपाय होतो.

दातांचे विकार, अंगावर सूज येणे यात चिंच त्याज्य समजावी.

कवीला भासणारे 'हे चिंचेचे झाड दिस मज चिनार वृक्षापरी' या प्रकारचा कलप्नाविलास चिंच खाऊन सत्यात उतरविता येईल. चिंच फळाच्या गुणधर्माचा अभ्यास करुन वैद्याच्या मार्गदर्शनाखाली त्याचे पन्हे विधीवत सेवन केल्यास आरोग्यास लाभ होईल.

Similar questions