Social Sciences, asked by anju4044, 10 months ago

चिंचणगावात राहणारा राजा मुंबईला राहणाऱ्या आपल्या दादाला
आपल्या घरची सर्व हकिकत पत्राने कळवत आहे, अशी कल्पना करून पत्र लिहा.​

Answers

Answered by xShreex
51

\huge\star\mathfrak\blue{{Answer:-}}

राजा अशोक वाडेकर

१०१, सानप वाडा,

मोरया गोसावी पथ,

चिंचणगाव,

आळंदी-५११ ३२१.

दि. ३ सप्टेंबर २०१२

प्रिय दादा,

साष्टांग नमस्कार, वि. वि.

तुझे पत्र मिळाले. आम्हांला आनंद झाला. आम्ही येथे सुखरूप आहोत. आपल्या मळ्यात भरपूर भाजी तयार झाली आहे. रोज भाजी करताना आईला तुझी आठवण येते.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे परवाच आपल्या तानी गाईला कालवड झाली. आईने आज खरवस केला आहे. खरवस खायला तू नाहीस, याचे आम्हांला वाईट वाटले.

माझी शाळा खूपच चांगली आहे. शिक्षकही चांगले आहेत. ते छान शिकवतात. गावातील देवळात गणेशोत्सवाची जोरात पूर्वतयारी चालू आहे.

ती. बाबा ठीक आहेत. त्यांची नेहमीची कामे चालू आहेत. वहिनीस साष्टांग नमस्कार. छोट्या अमूस गोड गोड पापा.

तुझा,

राजा

Similar questions
Math, 10 months ago