India Languages, asked by vidhya99233, 1 month ago

' चुडीवाला 'यासारख्या इतर व्यवसाय करणाऱ्या एखाद्या व्यावसायिकाची मुलाखत घेऊन प्रकल्प तयार करा.​

Answers

Answered by MrGoodBoi
16

Answer:

आपल्या व्यवसायाचे स्वरूप काय हे जरा सांगाल का?

माझा मशीनवर लोकरी कपडे व शाळांचे गणवेश शिवण्याचा व्यवसाय आहे. मुख्यत्वे माझ्याकडे लहान बाळांचे लोकरी कपड्यांचे सेट्स, फॅन्सी बेबी वूलन आयटेम्स, बेबी वेअर, फ्रॉक्स, वूलन टोप्या यांच्या घाऊक ऑर्डरी असतात. त्या खालोखाल स्त्रियांचे कार्डिगन्स, वूलन कॅप्स, जाकिटे, स्कार्फ, शाली यांनाही मोठ्या प्रमाणावर मागणी असते व ते शिवून द्यायचे काम मी करते. तसेच शाळांचे गणवेश व त्यासोबत लागणार्‍या अ‍ॅक्सेसरीज (जसे पी.टी.शॉर्टस्, बेल्टस्, मोजे, स्वेटर्स इ.) यांच्याही मी कंत्राटी स्वरूपात घाऊक प्रमाणावर ऑर्डर्स घेते. त्याचसोबत किरकोळ प्रमाणावरील ऑर्डर्सही येत असतात, त्याही पुर्‍या करत असते. तर्‍हेतर्‍हेच्या कापडी बॅग्ज, एप्रन्स इत्यादीही मी शिवून देते.

Similar questions