चाफा ही निडबन कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतले आहे
Answers
संगीतकाराला काव्याची उत्तम जाण असेल, तर त्याने दिलेल्या चालीवर कविता कशी मोहरते आणि रसिकांच्या मनात सदैव रेंगाळते याचं उत्तम उदाहरण म्हणजे कवी ‘बीं’चं वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं ‘चाफा बोलेना’ हे गाणं. १९ जानेवारी हा वसंत प्रभूंचा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज घेऊ या त्याच कवितेचा आस्वाद...
खूप दिवसांनी श्वेताशी फोनवर गप्पा झाल्या. दैनंदिन कामाच्या धबडग्यात मनमोकळ्या गप्पा मारायला हल्ली वेळ कुठे मिळतो? म्हणून खास सुट्टीच्या दिवशी वेळ काढून आम्ही बोललो. तिनं सांगितलं, ‘प्रतिमा, तू दिलेल्या चाफ्याला खूप छान फुलं आलीयत, इतकी सुंदर फुलं आहेत ना! बंगल्याच्या प्रवेशद्वाराशीच लावलेला हा चाफा नेहमी तुझी आठवण करून देतो. कधी येणार बघायला?’ फोनवरच्या गप्पा संपल्या आणि दिवसभर माझ्या मनात चाफा फुलत राहिला. श्रोत्यांना मी कवी ‘बीं’चा ‘चाफा’ ऐकवलासुद्धा. सुरुवातीला न बोलणारा, न फुलणारा; पण शेवटी भरभरून फुललेला. लतादीदींच्या स्वरांचा दरवळ घेऊन मनाच्या अंगणात उभा असलेला चाफा..
चाफा बोलेना चाफा चालेना
चाफा खंत करी काही केल्या फुलेना...
जर तुम्हाला काही मदद झाली तर बघा