चांगल्या पाठ्य पुस्तकाचे निकष काय
Answers
दर्जेदार पाठ्यपुस्तके तयार करायची तर राज्याला पाठ्यपुस्तकांचे व प्रक्रियेचे काही निकष ठरवावे लागतील.
दर्जेदार पाठ्यपुस्तक म्हणजे नेमके काय?
प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवणे हे प्रत्येक शिक्षकाला जमले पाहिजे. या कामात खऱ्या अर्थाने सहाय्यभूत ठरणाऱ्या पाठ्यपुस्तकांना ‘दर्जेदार पाठ्यपुस्तके’ म्हणता येईल. आजही भारतातील बहुतांश मुलांपर्यंत पाठ्यपुस्तक हेच एकमेव छापील साहित्य पोहोचते. त्यामुळे पाठ्यपुस्तकांची गुणवत्ता ही अत्यंत गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. गुणवत्तेचे काही ढोबळ टप्पे या बाबतीत आखता येतील. १) पाठ्यपुस्तकात एकही घोडचूक नाही, लहानसहान चुकाही नाहीत. २) मुलांना ते आपलंसं वाटतं, स्वतःहून वाचावंसं वाटतं. ३) पाठ्यपुस्तक मुलांना शिकण्याची प्रेरणा देतं, शिकण्यासाठी सक्रिय करतं व शिकण्याच्या प्रक्रियेत मदत करतं. ४) प्रत्येक बालकाला शिकवण्यात पाठ्यपुस्तक यशस्वी होतं. या निकषांवर पाहिलं तर महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तकांना बरीच मजल गाठायची आहे. आपली बरीचशी पाठ्यपुस्तके आजही पहिल्या-दुसऱ्याच टप्प्याशी झगडत आहेत असे खेदाने म्हणावे लागते.