(चुक की बरोबर ते लिहा) अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तान सोबत संबंध सुधारण्यात पुढाकार घेतला.
Answers
वाक्यातील चुकी सुधारल्यानंतर वाक्य खालीलप्रमाणे असेल...
अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तान सोबत संबंध सुधारण्यात ...शांतता चर्चेसाठी मोठा... पुढाकार घेतला
स्पष्टीकरण:
अटलबिहारी वाजपेयी 1998 मध्ये पंतप्रधान होते. 1998 च्या उत्तरार्धात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानशी शांतता चर्चा करण्यासाठी मोठा पुढाकार घेतला आणि या उपक्रमाचा एक भाग म्हणून त्यांनी लाहोर ते दिल्ली दरम्यान बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
फेब्रुवारी 1999. मध्ये ते स्वत: या बसमधून पहिल्या प्रवासात पाकिस्तानात गेले. त्यांच्यासमवेत चित्रपटातील कलाकार देवानंद, शत्रुघ्न सिन्हा, क्रिकेटपटू कपिलदेव, गीतकार जावेद अख्तर आणि पत्रकार-लेखक कुलदीप नय्यर यांच्यासह अनेक मान्यवर, राजकारणी आणि मुत्सद्दी उपस्थित होते. त्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ होते. वाजपेयी यांनी पाकिस्तानमधील अनेक मान्यवरांची भेट घेतली आणि पाकिस्तानशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर पाकिस्तानने दगा दिला आणि त्याच वर्षी कारगिल युद्ध झाले.
☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼
Answer:
वरचे उत्तर बरोबर आहे