India Languages, asked by sachin33109, 11 months ago

*चुक कुठे झाली ?..*
एक खूप हुशार मुलगा होता. संपुर्ण शैक्षणिक आयुष्यात पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण होत राहिला. सायन्स मध्ये नेहमी 100% मार्क मिळवले.
अशी बहुतेक मुलं इंजिनियरींग साईडला जातात, म्हणून त्याची ही निवड आय.आय.टी. चेन्नई मध्ये झाली. तेथून त्याने बी. टेक. ची पदवी मिळवली. पुढील शिक्षणासाठी तो अमेरिकेला गेला आणि यूनिव्हर्सिटी ऑफ़ कॅलिफोर्निया मधून तो एम. बी. ए. झाला.
आता इतके शिक्षण घेतल्यावर तेथे चांगली नोकरी तर मिळतेच. तो तेथेही नेहमी टॉपरच राहिला. तेथेच नोकरी करायला लागला.
*त्याचे पाच बेडरूमचे घर होते. चेन्नईच्याच एका खूपच सुंदर मुलीशी त्याचे लग्न झाले. एका माणसाला आपल्या जीवनात अजून काय पाहिजे? शिकून सवरुन इंजिनियर झाला, अमेरिकेत स्थाईक झाला, मोठ्या पगाराची नोकरी, बायको, मुले, सुखच सुख....*
पण दुर्भाग्याने आजपासून चार वर्षांपूर्वी त्याने तेथे अमेरिकेत, आपल्या पुर्ण परिवारासह आत्महत्या केली. आपली पत्नी आणि मुलांना गोळी मारून स्वतःला ही गोळी मारून घेतली.
*काय चूक झाली होती? शेवटी असं काय घडलं? गडबड कुठे झाली?*
हे पाऊल उचलण्याआधी त्याने आपल्या पत्नीशी विचारविनिमय केला होता, मग एक लांबलचक सुसाईड नोट लिहिली आणि आपल्या या कृतीचे समर्थन केले.... आणि या परिस्थितीत हाच एक सर्वोत्तम मार्ग होता असे लिहीले.
त्यांच्या या केसचा आणि सुसाईड नोटचा कॅलीफोर्निया इन्स्टीट्यूट आॅफ क्लिनीकल फिजीकाॅलाॅजी ने *‘काय चूक झाली ?' हे माहीत करण्यासाठी अभ्यास केला.*
सर्वात आधी कारण काय होते ते सुसाईड नोट मधून आणि मित्रांकडून माहीत केले.
*अमेरिकेच्या आर्थिक मंदीमुळे त्याची नोकरी गेली. बरेच दिवस रिकामे बसून रहावे लागले. नोकरी शोधत राहीला. मग आपला पगार कमी करत गेला आणि तरीही नोकरी मिळाली नाही, घराचा हप्ता थकला, रस्त्यावर येण्याची वेळ आली.*
काही दिवस कुठल्याशा पेट्रोल पम्पावर तेल भरायचे काम केले. वर्षभर हे सर्व सहन केले आणि शेवटी पति पत्नीने मुलांसह आत्महत्या केली...
*तज्ज्ञांनी या घटनेचा सार असा काढला की या माणसाची मानसिकता फक्त यश मिळवणे यासाठीच तयार झालेली होती, परंतु अपयशाचा सामना कसा करायचा याचे शिक्षण त्याला मिळालेच नव्हते....*
आता त्याच्या जीवनावर सुरुवातीपासून नज़र टाकू या.
अभ्यासात खूप हुशार होता, नेहमी पहिल्या क्रमांकावरच उत्तीर्ण झाला. अशा बऱ्याचशा पालकांना मी ओळखतो, ज्यांची हीच इच्छा असते की त्यांच्या मुलाचा वा मुलीचा नेहमी पहिलाच क्रमांक यावा, त्यांच्याकडून कधीच चूक होऊ नये. चूक झालीच तर जसे खूप मोठे पाप केले आहे आणि त्यांने पहिला यावे यासाठी ते काहीही करायला तयार असतात.
मग अशी मुलं काहीशी जास्तच अभ्यासू असतात म्हणून खेळणे, कूदने, फिरणे, लढणे, भांडणे, मारामारी अशा संधी बिचाऱ्यांना फारच कमी मिळतात.
बारावी उत्तीर्ण होऊन आले तर इंजीनियरिंग कॉलेजचे ओझे लादले जाते बिचाऱ्यांवर, तेथून निघाला तर एम. बी. ए. आणि अजून शिकतच आहे तर मोठ्या पगाराची नोकरी. *आता मोठा पगार म्हटला की जबाबदारी पण मोठी म्हणजे मोठे मोठे टार्गेटस्...*
*हे जग फार कठोर आहे. आणि हे जीवन वेगवेगळ्या परिक्षा घेते. आपली कॉलेज ची डिग्री आणि मार्कशीटशी त्याला काही देणेघेणे नाही. तेथे किती मार्क मिळवले याच्याशी काही फरक पडत नाही.*
*हे जीवन आपली वेगळी प्रश्नपत्रीका समोर ठेवते. आणि सर्व प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरचे असतात, वेडेवाकडे, बिनबुडाचे, आणि दररोज परीक्षा घेते, कुठलेही वेळापत्रक नसते.*
एका इंग्रजी कादंबरीत एक गोष्ट वाचली होती...
*एक मेंढीचे पिल्लू आपल्या आईपासून दूर निघून जाते. पुढे जाऊन आधी म्हशींच्या कळपात घेरले जाते. त्यांच्या पायांखाली चिरडले जाण्यापासून कसेतरी वाचते. आता थोडेच पुढे चालले होते की एक कोल्हा त्याच्याकडे झेपावतो. कसेतरी झुडपांमध्ये घुसून ते आपला जीव वाचवते तर समोरून लांडगे येताना दिसतात. खूप वेळ झुडपांमध्ये लपून बसते, कसं तरी आई जवळ परत येते व म्हणते, "आई, तेथे तर खूप भयानक जंगल आहे." *There is a Horrible Jungle out There.*
*अशा या खतरनाक भयाण जंगलात जिवंत टिकून रहाण्याचेही प्रशिक्षण मुलांना जरूर द्या.*

*विशेष म्हणजे मुलांना फक्त पुस्तकी किडा बनवू नका, मुलांना अभ्यासा बरोबरच धार्मिक, व्यावहारिक, सामाजिक संस्कार देणं ही गरजेचे आहे. प्रत्येक परिस्थितिला आनंदाने व धैर्याने सामोरे जाण्याची क्षमता व त्यातून उभारण्याचे ज्ञान आणि मानसिकता मुलांमध्ये असणे आवश्यक आहे.*

*शेवटी आपली मुलं आपलीच आहेत ना*​

Answers

Answered by snehaldeshmukh58
0

Answer:

Similar questions