चेकोस्लोव्हेकियाचे कोणत्या दोन राष्ट्रांमध्ये
विनाजन झाले
Answers
Explanation:
पश्चिमेकडचा हर्सिनियन खडकांचा उंच प्रदेश आणि पूर्वेचा तृतीयक कालखंडातील खडकांचा भाग हे यूरोपातील भिन्न भूप्रकार या देशात समोरासमोर येतात त्याचप्रमाणे उत्तर यूरोपचा मैदानी प्रदेश आणि दक्षिण यूरोपचे डॅन्यूबचे मध्य खोरे याच देशात एकमेकांना जोडली जातात त्यामुळे चेकोस्लोव्हाकियाला यूरोपचा चौक किंवा चव्हाटा ही भौगोलिक संज्ञा यथार्थतेने मिळालेली आहे. देशाचे तीन स्पष्ट नैसर्गिक विभाग पडतात : पश्चिमेस प्राचीन कठीण खडकांचा बोहीमिया हा एकसंघ पर्वतपुंज त्याच्या मध्याला पठार व सखल प्रदेश आणि भोवताली पर्वतराजींचे कडे त्याच्या पूर्वेस मोरेव्हियाचा सपाट प्रदेश आणि त्याच्याही पूर्वेस कार्पेथियन पर्वतभागात स्लोव्हाकिया.
बोहीमियाच्या कडेकडेचे बहुतेक पर्वत एकदम उभ्या चढाचे असून शुमाव्हा आणि कर्कॉनॉशेसारख्या भागांत खूप उंच आहेत दक्षिणेकडे मात्र पठार थोड्या गोल टेकड्यांपुरतेच उंचावलेले व संचारास सोपे आहे. बाकीच्या तीन दिशांना दळणवळणास उत्तुंग पर्वतांचा प्रतिबंध असून विशेषतः नैर्ऋत्य भागात शुमाव्हा व चेस्कीलेस हे बोहीमियन वनप्रदेश दुर्लंघ्य आहेत. वायव्येस क्रुश्ने हॉरी हा धातुक पर्वत लोहेतर खनिजांसाठी प्रसिद्ध आहे. ईशान्येत सुडेटन पर्वतांच्या त्रुटित रांगा आहेत. कर्कॉनॉशे हे या भागातील सर्वांत उंच (१,६०२ मी.) शिखर होय. या भागात कित्येक खोलगट प्रदेश असून कोळशाच्या खाणी व विद्युत्निर्मितीस उपयुक्त जलप्रवाह आहेत. बोहीमियाच्या उत्तर भागातील सखल प्रदेशात अनेक डोंगर, उर्मिल भूप्रदेश, टेकड्या, नद्या व सुपीक खोरी आढळतात. धातुक पर्वताला समांतर अशी ज्वालामुखीजन्य डोंगराची चेस्के स्त्रेदोहॉरी ही रांग असून तिच्या दक्षिणेस खोलगट प्रदेशात कोळशाच्या खाणी आणि दुपाउफ्स्की हॉरीच्या सलग टेकड्यांचा एक विस्तीर्ण डोंगरभाग आहे. त्याच्या कडांतून कित्येक ठिकाणी नैसर्गिक औषधी पाण्याचे गरम झरे आहेत. दक्षिण बोहीमियाचे पठार उत्तर भागापेक्षा बरेच उंच असून त्यात नद्यांनी खणून काढलेल्या खोल दऱ्या आढळतात. पूर्वी बर्डी टेकड्यांसारख्या भागात सापडणाऱ्या लोहधातुकाचा साठा आता संपलेला आहे तथापि कोळसा आणि लोहधातुकावर आधारलेली बोहीमियाची परंपरागत कारखानदारी पल्झेनसारख्या औद्योगिक केंद्रात आयात लोखंडकोळशावर चालू आहे. मोरेव्हिया-सायलीशिया हा मध्यवर्ती नैसर्गिक विभाग भूपृष्ठरचनेतील दोन वेगळ्या जातींच्या खडकांमधील सीमाप्रदेश आहे. मोरेव्हिया हे डॅन्यूबच्या मोराव्हा उपनदीचे ऊर्मिल क्षेत्र हे दक्षिणेचे डॅन्यूब मैदान व उत्तरेचे सायलीशिया मैदान यांना जोडणारे आहे. पश्चिमेकडून बोहीमियाच्या टेकड्या या बाजूस सावकाश उताराने आलेल्या आहेत. पूर्वेस मात्र कार्पेथियमच्या बेस्किदी पर्वतभागाकडे चढ एकदम सुरू होतो. ईशान्येकडे अरुंद होत गेलेल्या या सपाट प्रदेशात मोराव्हाला मिळणाऱ्या नद्या आहेत. बेच्व्हा नदी आणि मोरेव्हीयाचे महाद्वार, ‘मॉराफ्स्का ब्राना’ ही विख्यात खिंड याच भागात आहे. येथून जवळच ओडर (ओड्रा) नदी उत्तरेकडे पोलंडमध्ये प्रवेश करते. डॅन्यूब नदीखोरे व उत्तर यूरोप मैदान यांच्या दरम्यान सोईचा हा एक ऐतिहासिक मार्ग असून आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या याला अनन्यसाधारण महत्व आहे. यावरून रस्ते व लोहमार्ग गेले आहेत आणि डॅन्यूब व ओडर नद्यांना जोडणारा संकल्पित कालवाही याच मार्गाने जाणारा आहे. दक्षिण मोरेव्हियाची भूमी सुपीक आहे. अगदी उत्तरेकडच्या प्रदेशात सायलीशियन कोळसाक्षेत्राचा नैर्ऋत्य भाग येतो तेथील खाणींतील कोळशावर लोखंड-पोलादाचे मोठे कारखाने चालतात. स्लोव्हाकियातील कार्पेथियन पर्वतप्रदेश म्हणजे ऑस्ट्रियातील आल्प्सच्या विस्ताराचा डॅन्यूबच्या पलीकडे ईशान्येकडे गेलेला भाग होय. दक्षिणेत पश्चिम-पूर्व रांगा असलेले छोटे कार्पेथियन (मार्ले कार्पेटी) उत्तरेकडे उंच होत जातात. त्यांच्या रांगांदरम्यान रुंद खोरी आहेत. अगदी उत्तरेकडे बेस्किदी पर्वताचे तुटक कणे असून तो प्रदेश संचार सुलभ आहे. त्याच्या दक्षिणेस उंच तात्रा पर्वत असून त्यातील गेर्लाकॉफ्का (पूर्वीचे स्टालिनो) हे २,६५५ मी. उंचीचे देशातील सर्वोच्च शिखर आहे. त्यांच्या दक्षिणेस लिप्टॉफ्स्की खोरे व ठेंगू तात्रा आणि अगदी दक्षिणेस स्लोव्हाकियन धातुकपर्वत असून हेही हालचालींना सोपे आहेत. पूर्वी हा भाग खनिजसंपन्न होता आता उपयुक्त वनांनी आच्छादित आहे.