India Languages, asked by jayingle1045, 8 months ago

चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) कवितेतील कष्टकरी आईची अवस्था कशी आहे?
(आ) कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याच्यासाठी काय करत असे?
(इ) कवीच्या आईचे डोळे का भरून येतात?
(ई) आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा, असे कवीला का वाटते? ?
(उ) आईसाठी कवीला काय करावेसे वाटते?
२. कोण, कोणास व का म्हणाले?
(अ) करू नको घाई म्हणे पोटभर खाय,
(आ) बस झालं शिक्शन याचं घेऊ दे हाती रूमनं.
(इ) या डोयानं पाहीन रे मी दुधावरची साय,​

Answers

Answered by ghoderaosagar0
8

बस झालं शिक्शन याचं घेऊ दे हाती रूमनं.

Answered by rajraaz85
1

अ.कवितेतील कष्टकरी आई ही दिवसभर माळरानात फिरत असते व आपल्या घर चालवण्यासाठी लाकडे गोळा करत असते फिरत असताना तिला कसलीही भीती वाटत नाही तिला कधीही आपल्या पायाला काटा टोचला किंवा आपल्या अनवाणी पायांना विंचू चालेल किंवा त्याला इजा होईल अशी कुठलीही भीती तिच्या मनात कधीच नसते अशाप्रकारे कष्टकरी आईची अवस्था आहे.

. आपला मुलगा वस्तीगृहात राहत असल्यामुळे त्याला तिथे खाण्यासाठी चांगले पदार्थ मिळत नसतील, यामुळे तो घरी आल्यावर आई त्याच्यासाठी त्याला आवडणारे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करून खाऊ घालते. त्या पदार्थ करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची व्यवस्था ती अगोदरच करून ठेवते.

. आपल्या मुलाचे आयुष्य आपल्यासारखे काबाड कष्टातून न जाता तो शिकून मोठा व्हावा व त्याने काहीतरी नोकरी करावी अशी आईची इच्छा असते परंतु जेव्हा त्याचे बाबा त्याला म्हणतात की भरपूर झाले शिक्षण आता शेतात काम कर हे शब्द ऐकून आईच्या डोळ्यात पाणी येते.

ई. तिच्या वाट्याला आलेले काबाडकष्ट ती नेहमी करत असते व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाबांच्या मताची पर्वा न करता लेखकाला शिक्षणासाठी प्रोत्साहन देते व त्यासाठी ती काहीही करायला तयार असते यामुळे लेखकाला असे वाटते की याच आईच्या पोटी आपला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा.

उ. आपल्यासाठी दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या आईला सर्व सुख मिळावे यासाठी तिची आनंदान ओटी भरावी असे कवीला वाटते व तिच्या पोटी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे अशी इच्छा कवी प्रकट करतो.

२. कोण कोणास म्हणाले.

. वरील वाक्य कवीची आई कवीला म्हणाली कारण कवी हा बाहेरगावी शिक्षणासाठी राहत असल्यामुळे त्याला योग्य ते अन्न खायला मिळत नव्हते त्यामुळे त्याने सावकाश पोट भरून यावे यासाठी वरील उद्गार कवीच्या आईने कवीसाठी काढलेले आहेत.

आ. वरील वाक्य हे कवीच्या वडिलांनी कवीच्या आईला म्हटले कारण त्यांना वाटते की आता मुलगा मोठा झाला व त्यांनी शेतात काम करावे व त्यांना मदत करावी.

इ. वरील वाक्य कवीची आई कविला म्हणाली कारण तिला आपल्या मुलाचा सुखी संसार बघायचा आहे व त्याची मुले तिला खेळायची आहेत म्हणून वरील उद्गार ती आपल्या मुलाजवळ काढते.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://brainly.in/question/22904811

#SPJ3

Similar questions