चौरसाचे गुणधर्म लिहा .||please help me guys||
Answers
Step-by-step explanation:
चौरसाचे गुणधर्म लिहा .
चौकानाचे प्रकार व गुणधर्म
१)चौरस -ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप व प्रत्येक कोण काटकोन असतो ,त्या चौकानासचौरस असे म्हणतात.
⧭⧭ चौरसाचे गुणधर्म :-
१- चौरसाचे कर्ण एकरूप असतात . २- चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात .
३-चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात .
२)आयत -ज्या चौकोनाचे सर्व कोण काटकोन असतात ,त्या चौकोनास आयत म्हणतात.
⧭⧭ आयताचे गुणधर्म :-
१-आयताच्या संमुख बाजू एकरूप असतात. २-आयताचे कर्ण एकरूप असतात .
३-आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात.
३) समभूज चौकोन -ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात ,त्या चौकोनास समभूज चौकोन असे म्हणतात .
⧭⧭ समभूज चौकोनाचे गुणधर्म :-
१-समभूज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात . २-समभूज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात . ३-समभूज चौकोनाचे संमुख कोन एकरूप असतात .
४)समांतरभूज चौकोन -ज्या चौकोनाच्या संमुख बाजू समांतर असतात ,त्या चौकोनास समांतरभूज चौकोन असे म्हणतात .
⧭⧭ समांतरभूज चौकोनाचे गुणधर्म :-
१-समांतरभूज चौकोनाच्या संमुख भुजा एकरूप असतात. २-समांतरभूज चौकोनाच्या संमुख भुजा एकरूप असतात .३-समांतरभूज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात .
५)समलंब चौकोन -ज्या चौकोनाच्या संमुख बाजूंची केवळ एकच जोडी समांतर असते ,त्या चौकोनाला समलंब चौकोन असे म्हणतात .