Science, asked by StarTbia, 1 year ago

चित्राचे निरीक्षण करून प्रत्येक घटकातील संबंध स्पष्ट करा.

Attachments:

Answers

Answered by ajaybh3103
11

वरील चित्र निसर्गातील अन्नसाखळीचे आहे. निसर्गाने अन्नसाखळी या करता तयार केली  आहे जेणेकरून पर्यावरणातील सर्व सजीवांच्या जीवनशैलीत समतोल राखला जाईल. या चित्राचे निरीक्षण केल्यास असे दिसून येते की सूर्य हा पर्यावरणतील  मोठा घटक आहे त्याच्या सूर्यप्रकाशाचा वापर करून वनस्पति आपले अन्न तयार करत आहेत व आपली वाढ करत आहेत. म्हणजेच वनस्पति सूर्यावर अवलंबून आहेत. त्यानंतर छोटे मोठे किडे, उंदीर आणि असेच लहान प्राणी या वनस्पतीवर वर अवलंबून आहेत. वरील अन्नसाखळी मधील तिसरा घटक हा बेडूक आहे हा लहान मोठे किडे खातो.म्हणजेच बेडकाचा उदरनिर्वाह हा अन्न साखळीतील दुसर्‍या घटकावर अवलंबून आहे. त्यानंतर या अन्नसाखळीतील चौथा घटक साप आहे जो बेडकावर अवलंबून आहे. कारण निसर्गाने त्याचे अन्न बेडूक बनवले आहे जेणे करून पर्यावरणातील बेडकांच्या प्रजातींचा समतोल राखला जाईल. गरुड, घार ज्यांना स्कॅव्हेंजर म्हणतात ते या अन्नसाखळीतील पाचवा घटक आहेत त्यांचे अन्न साप किवा त्यांच्या सारखे प्राणी असतात. जेव्हा हे पक्षी मारतात तेव्हा त्यांचे शव हे  मातीतील सूक्ष्मजीव खातात याचा अर्थ सूक्ष्मजीव हे निसर्गातील अन्नसाखळीचे शेवटचे घटक आहेत.

Similar questions