चैत्र महिना हा खरा वसंतात्मा, मधूमास आहे.
no spamming i will report your answer
Answers
Answer:
चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून (प्रतिपदा) भारतीय नववर्ष सुरु होते.
या महिन्याला पूर्वी मधुमास असं म्हणत.
वंसंतऋतूचे आगमन फाल्गुन महिन्यात वसंतपंचमीला होते.
मात्र त्याची झलक चैत्रात बघायला मिळते. हवेतील उब, कोकिळ्गायन, वसंतातील खास फुलांचे उमलणे, पाखरांचे कूजन इ.
या कालात झाडांना नवी पालवी येते तिला चैत्रपालवी म्हणतात.
या महिन्याच्या मागेपुढे चित्रा नक्षत्र येते म्हणून या महिन्याला चैत्र महिना म्हणतात.
या कालात बंद खिडक्या-झरोके उघडून प्रकाश आत येतो. या काळात घरसफाई करतात. गरम कपडे-पांघरुणे यांना रजा देतात. नवे धान्य खरेदी करतात. नव्या वर्षाचे स्वागत करतात.
या महिन्यात साधकांनी करायची धार्मिक कार्ये याप्रमाणे आपल्या धार्मिक ग्रंथात सांगितली आहेत.
१) वर्षप्रतिपदा (गुढीपाडवा)
२) श्रीरामनवरात्र (चैत्र शु. १ ते ९)
३) गौरी तीज (चैत्र शु. ३)
४) चैत्र गौर नवरात्र (चैत्र शु. ३ ते चैत्र शु १२)
५) चैत्र गौर उत्सव (चैत्र शु. ३ ते वै. शु ३)
६) श्रीरामनवमी (श्रीरामजन्म) चैत्र शु ९
७) चैत्र शु. ११ (वैष्णवांचा उपवास)
८) श्रीहनुमान जयंती (चैत्र शु. १५)
९) वैशाख स्नान (चैत्र कृ १ ते वैशाख शु. १५)
१०) चैत्र संकष्टी चतुर्थी (गाणपत्यांचा उपवास)
११) चैत्र कृ. ११ (वैष्णवांचा उपवास)
१२) चैत्र अमावस्या
I hope this answer is help you
thanks