२) चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्य
अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानल
जातात.
Answers
Answer:
सामंतशाही समाजव्यवस्थेला बाजूला सारून भांडवलशाहीवर आधारित समाजव्यवस्था प्रस्थापित होण्यास सुरुवात होते, तिथे मध्ययुगीन कालखंडाचा अंत व आधुनिक कालखंडाची सुरुवात मानली जाते. अर्थात, समाजव्यवस्थेतील बदल एका रात्रीतून घडत नाहीत. म्हणूनच दोन कालखंडांच्या बदलाचा काळ हा दोन्ही कालखंडांतील वैशिष्टय़ांनी युक्त असतो. भारताच्या संदर्भात आधुनिक कालखंडाच्या उदयाचा काळ वरील निकषानुसार ठरवणे कठीण आहे.
इतिहासकारांमध्ये भारतीय आधुनिक कालखंडाच्या उदयासंदर्भात मतभेद असले तरी ब्रिटिश सत्तेच्या बंगालमधील स्थापनेपासून नेहरू युगाच्या अस्तापर्यंतच्या काळाचा अंतर्भाव या कालखंडात होतो. अर्थात, ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेसाठी आवश्यक पाश्र्वभूमी तयार करणाऱ्या उत्तर मुघल काळाचा या संदर्भातील अभ्यास आवश्यक ठरतो. आधुनिक इतिहासाची विभागणी चार भागांमध्ये करता येईल- ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा काळ (१७५७-१८५७); भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचा काळ (१८५७-१८८५); भारतीय राष्ट्रीय चळवळीचा काळ (१८८५-१९४७); नेहरू युग (१९४७-१९६४). नेहरू युगाची चर्चा आपण या लेखमालेच्या ‘भारताचे स्वातंत्र्योत्तर दृढीकरण’ या लेखात करू या.
ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील प्रवास एका व्यापारी संघटनेपासून व्यापारी-लष्करी- राजकीय संघटनेपर्यंत होतो. अस्थिर राजकीय परिस्थितीचे कारण दर्शवत कंपनीने लष्करी स्वरूप प्राप्त केले. बंगालमधील कंपनीचा राजकीय हस्तक्षेप व दस्तकांचा (Free Passes) गरवापर यातून प्लासी व बक्सारचा संघर्ष उभा राहतो. प्लासीची लढाई कंपनीला बंगालच्या राजकारणातील महत्त्वाचा घटक बनवते, तर बक्सारच्या लढाईतून कंपनी उत्तर भारतातील एक महत्त्वाची सत्ता होते. या लढायांतून कंपनीचे मनोबल उंचावते. यांचा अभ्यास केवळ लढाई म्हणून न करता त्यांचा व्यापक संदर्भ लक्षात घेऊन होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करावा लागतो.