चित्रकार म्हणजे काय........
Answers
Answered by
2
Explanation:
चित्रकाराच्या नजरेतूनः जाणिजे चित्रकर्म
माझ्या एका चित्रावर सहज यांनी सुरु केलेल्या धाग्याला अनेक प्रकारचे प्रतिसाद लाभले. या चित्राबद्दल खुद्द चित्रकाराची काय भूमिका आहे, अशी काहींनी पृच्छा केली, त्यावर हे लेखन करतो आहे.
प्रत्यक्ष माझ्या त्या विशिष्ट चित्राविषयी काही सांगण्याआधी चित्रकलेविषयी थोडी पूर्वभूमिका:
चित्रकलेचे अनेक प्रकार, पंथ, शैली, विचारसरणी असल्या, तरी सुरुवात म्हणून एकंदर चित्रांना दोन प्रकारात विभाजित करूया:
१. वर्णनात्मक चित्रे, आणि
२. केवल चित्रे ( वा केवलात्मक चित्रे).
या दोन प्रकारच्या चित्रांची उदाहरणे: (तिन्ही चित्रे माझी)
चित्र १: एका खेडेगावातील दृश्य: हे कोणते गाव आहे, कुठे आहे, कोणत्या काळातील आहे, यात दिसणारे घर कुणाचे आहे, अश्या प्रकारचे प्रश्न विचारले जाउ शकतात, व त्यांची उत्तरेही शोधली जाऊ शकतात.
वर्णनात्मक चित्रात एखादी घटना, व्यक्ती, वस्तू, निसर्ग, किंवा काही विचार, कल्पना, कथा इ. चे चित्रण केलेले असते. असे चित्र बघून त्या गोष्टी विषयी आपल्याला माहिती तर मिळतेच, शिवाय कलावंताच्या कलात्मक करामतीतून आनंद, विस्मय, दु:ख, कुतूहल, शांती वगैरे भावना वा रस ही उद्दीपित होऊ शकतात.
केवल चित्रात असले काहीच नसते. चित्र बनवण्याची (व बघण्याची) क्रिया हीच यातील घटना, व पूर्ण झालेले चित्र हीच एक वस्तू. असे असल्याने अश्या चित्रातून काही अर्थ व आशय शोधणे व्यर्थ असते. असे चित्र हे 'कशाचे तरी चित्र' नसून त्याचे एक स्वयंसिद्ध, स्वयंपूर्ण अस्तित्व असते. असे चित्र बघताना कोणतीही माहिती मिळत नसली, तरी सौंदर्यबोध, कलात्मक आनंद, विस्मय, वा अन्य भावनात्मक अनुभव येत असतात.
वर्णनात्मक चित्रांचा इतिहास हजारो वर्षांचा असून त्यात अनेक काळातील, अनेक देशातील, अनेक शैलीतील अनेक प्रकारची चित्रे समाविष्ट करता येतात. केवलात्मक कला त्यामानाने बरीच अलिकडची आहे.
वर्णनात्मक चित्रकलेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी दीर्घ परिश्रम व साधनेची गरज असते. रेखाटन, स्थिरवस्तू चित्रण, व्यक्तिचित्रण, निसर्गचित्रण, छाया-प्रकाशाचा आभास, पर्स्पेक्टीव्ह, शरीर शास्त्र, रंगलेपनपद्धती, मानावाकृतीचे संयोजन असे अनेक विषय दीर्घ प्रयत्नानेच साध्य होतात. हे सर्व शिकून त्यावर आधारित स्वत:ची अशी चित्रपद्धती विकसित करण्यात आयुष्य खर्ची पडते. एक एक चित्र पूर्ण करायलाही भरपूर वेळ लागतो
please mark as brainlisit
Answered by
13
Answer:
चित्रकार म्हणजे चित्र काढणारी व्यक्ती
Similar questions