Hindi, asked by ujjawal5312, 1 year ago

चित्रपटाचे प्रकार स्पष्ट करा

Answers

Answered by AbsorbingMan
98

चित्रपटाच्या ऐतिहासिक विकासक्रमात दीर्घ लांबीच्या कथाप्रधान चित्रपटांबरोबरच व्यंगचित्रपट, वार्तापट, अनुबोधपट, प्रसिद्धिपट, बालचित्रपट, सैनिकी चित्रपट, शैक्षणिक चित्रपट यांसारखे अनेक प्रकार उदयास आले. त्यांपैकी मुख्य आकर्षण कथाचित्रपटांचेच होते. हे कथाचित्रपट पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक इ. विषयांवरील असतात.  

चित्रपटकलेचा इतिहास घडत व्यंगचित्रपटांचाही जन्म झाला. कथानकावर आधारलेला चित्रपट ज्यावेळी जन्मास आला, त्याच सुमारास व्यंगचित्रपटदेखील अस्तित्वात आला होता. गेम ऑफ प्लेइंग कार्ड्‌स   हा चित्रपट तयार करणाऱ्या झॉर्झ मिली व आर्. डब्ल्यू. पॉल यांनी व्यंगचित्रपट तयार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे व्यंगचित्रपटाचे जनकत्व त्यांना देण्यात येते; परंतु १९०८ साली एमील कोल याने जो सु. ३१ मी. लांबीचाफॅंटास्मागोरिया  हा प्राथमिक स्वरूपाचा व्यंगचित्रपट तयार केला होता, तोच खऱ्या अर्थी पहिला व्यंगचित्रपट मानला जातो. त्या व्यंगचित्रपटासाठी त्यावेळी त्याला वेगवेगळ्या हालचालींची दोन हजार चित्रे रेखाटावी लागली होती; परंतु पूर्णत्वाला पोहोचलेल्या रिलक्टंट ड्रॅगन  यासारख्या व्यंगचित्रपटासाठी तर वॉल्ट डिझ्नीला निरनिराळ्या वीस हजार चित्रांचा उपयोग करावा लागला. १९२८ साली त्याच्या एका बोलक्या व्यंगपटात मिकी माऊसचा प्रथम अवतार झाला. १९३७ साली डिझ्नीने स्नो व्हाईट अँड द सेव्हन ड्‌वार्फ्‌स  हा पहिला व्यंगचित्रपट तयार केला. साध्या वा रंगीत बोलपटांप्रमाणेच व्यंगचित्रपटदेखील अतिशय लोकप्रिय झाले व त्याच प्रमाणात अधूनमधून रंगीत बोलक्या व्यंगचित्रपटांची निर्मिती होऊ लागली.

Answered by Sahil00004
3

Answer:

चित्रपटांच्या काही मुख्य विधा :

१.      देमार (ॲक्शन) – शक्ती-शौर्यप्रदर्शन, घटनांचा वेग, संकलनाद्वारे वेग, चांगल्या-वाइटाचा संघर्ष.

२.      साहसपट (ॲडव्हेंचर) – पर्वत, समुद्र, जंगल, वाळवंट इत्यादींवरच्या साहसी मोहिमा.

३.      विनोदपट (कॉमेडी) – प्रसंगाधिष्ठित, शारीर हालचालींवर आधारित, विसंगत व्यक्तिमत्त्वांच्या एकत्र येण्याने सातत्याने होणारी हास्यनिर्मिती.

४.      गुन्हेगारीपट-टोळीपट (क्राइम-गँगस्टर) – गुन्हा घडणे आणि गुन्हेगाराचा शोध हे आशयसूत्र धरून गुन्हा सिद्ध होणे, गुन्हेगारांना शिक्षा होणे, त्यांचा नायनाट करणे, बदला घेणे इत्यादी उपप्रकार हाताळले जातात.

५.      नाट्यपट (ड्रामा) – ही सगळ्यांत जास्त वापरली जाणारी विधा आहे. संविधानकाला धरून मांडणी करताना जीवनव्यवहारांना धरून येणारी सविस्तर व्यक्तिचित्रणे, त्यांचे नातेसंबंध-आंतरक्रिया, घडणाऱ्या बऱ्यावाईट घटना यांना किंवा चरित्रकथनाला महत्त्व दिलेले असते. वातावरण बरेचसे वास्तवदर्शी असते. विशेष परिणामासाठी (स्पेशल इफेक्ट) तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित असतो.

६.      ऐतिहासिक/भव्य चित्रपट (एपिक) – यामध्ये ऐतिहासिक, पौराणिक घटना किंवा व्यक्तिरेखा कथेच्या केंद्रस्थानी असतात. स्थलकालाचा विस्तार मोठा असतो. निर्मिती भव्य स्वरूपाची आणि चित्रपटांची लांबीही बहुतांश वेळा मोठी असते.

७.      युद्धपट – ऐतिहासिक युद्ध, काल्पनिक देशांमधील युद्ध किंवा युद्धाची योग्यायोग्यता हे आशयसूत्र केंद्रस्थानी असते. कथाविस्तारात युद्धाचे सविस्तर चित्रण वापरलेले असते.

८.      भयपट – यामध्ये आशयसूत्र कोणतेही असले, तरी प्रेक्षकांवर भीतीचा मनोकायिक परिणाम घडविण्यासाठी विशिष्ट कथनशैली, वातावरणनिर्मिती आणि चित्रपटीय तंत्रे वापरलेली असतात.

९.      संगीतिका – बहुतांश वेळा मुख्य पात्रांपैकी काही पात्रे गायन, वादन, नृत्य यांत पारंगत असतात. त्यांच्या जीवनातील नाट्य रोचकपणे दर्शविण्यासाठी, कथा-विस्तारासाठी गायन, वादन, नृत्य यांना महत्त्वाचे आणि मुबलक स्थान दिलेले असते.

१०.  पाश्चात्त्य-हॉलिवुडमधील विधा – जगभर पसरलेली, अजूनही जिवंत असलेली खूप जुनी विधा. यामध्ये धूळभरली अन्यायग्रस्त गावे, भव्य आसमंत, चांगल्या-वाइटाचा संघर्ष (मूळ विधेत काउबॉइज-अमेरिकन इंडियन्स यांच्यातला संघर्ष), नव्या भूभागाचा-साधनसंपत्तीचा शोध इत्यादी आशय असतो.

विशिष्ट विधांमधे सातत्याने निर्मिती होताना पात्रांचे, घटनांचे, वृत्तिप्रवृत्तींचे साचेही  तयार होत जातात. (उदा., जुन्या हिंदी चित्रपटांतील डाकू, मराठी तमाशापटातील गावचा पाटील इ.)

बहुतांश  चित्रपट  हे  दोन  किंवा  अधिक  विधांचे  मिश्रण  असतात. विधा ही तशी सुस्पष्ट, साचेबंद संकल्पना नाही. मोठ्या संख्येने निर्माण होणाऱ्या चित्रपटांच्या वर्गीकरणासाठी योजलेले ते एक साधन आहे.

Explanation:

Similar questions